Petrol-Diesel Price : देशात निवडणुकींनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार? सध्याचे दर काय?
Petrol-Diesel Price Today 30 January 2022 : देशात साधारणतः तीन महिन्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
Petrol-Diesel Price Today 30 January 2022, IOCL Updates : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) चे नवे जर जारी करण्यात आले आहेत. देश पातळीवर आज (रविवारी) म्हणजेच, जानेवारी 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Rates) किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. साधारणतः तीन महिन्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर शंभरी पार आहेत. देशात तेलाचे दर अद्यापही सामान्य माणसांच्या खिशावर भार आणत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानंतरही देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किमती (Fuel Price) स्थिर आहेत. देशात आज 26 जानेवारी, 2022 रोजीही कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, राज्य स्तरावर वाहनांच्या इंधनावरील व्हॅट (VAT) च्या वेगवेगळ्या दरांमुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे आहेत.
राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर
IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊयात मुंबई, पुण्यापासून नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत...
राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती :
प्रमुख शहरं | पेट्रोलची किंमत प्रति लिटर | डिझेलची किंमत प्रति लिटर |
मुंबई | 109.98 रुपये प्रति लिटर | 94.14 रुपये प्रति लिटर |
ठाणे | 110.12 रुपये प्रति लिटर | 94.28 रुपये प्रति लिटर |
पुणे | 109.72 रुपये प्रति लिटर | 92.50 रुपये प्रति लिटर |
नाशिक | 109.79 रुपये प्रति लिटर | 92.57 रुपये प्रति लिटर |
नागपूर | 110.10 रुपये प्रति लिटर | 92.90 रुपये प्रति लिटर |
कोल्हापूर | 109.66 रुपये प्रति लिटर | 92.48 रुपये प्रति लिटर |
अहमदनगर | 110.12 रुपये प्रति लिटर | 92.90 रुपये प्रति लिटर |
अमरावती | 111.14 रुपये प्रति लिटर | 93.90 रुपये प्रति लिटर |
देशातील महत्त्वाच्या शहरांतील किमती काय?