Petrol-Diesel Price : वीकेन्डला बाहेर जाताय? थांबा आधी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर चेक करा
Petrol-Diesel Price : भारतीय तेल कंपन्यांकडून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. तुमच्या शहरांतील दर काय?
Petrol-Diesel Price Today 24 July 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या (Crude Oil Price) किमतींमध्ये मोठी घट पाहायला मिळाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल 100 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास ट्रेड करताना दिसलं होतं. कच्च्या तेलाच्या दरांमध्ये मोठी घट झाल्यानंतरही देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol-Diesel Price) मात्र स्थिर आहेत. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) ची अधिकृत वेबसाईट iocl.com नं दिलेल्या लेटेस्ट अपडेटनुसार, देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यामुळे महागाईच्या गर्तेत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना काहीसा का होईना दिलासा मिळाला आहे.
भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींवर आधारित असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवरुन देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या दरांत सातत्यानं घसरण होत राहिल्यास राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकतं, असं तज्ज्ञांचे मत आहे.
iocl.com नं जाहीर केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.
महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
शहर | पेट्रोलच्या किमती | डिझेलच्या किमती |
मुंबई | 106.25 | 94.22 |
पुणे | 105 | 92 |
नागपूर | 106.03 | 92.58 |
नाशिक | 106.74 | 93.23 |
हिंगोली | 107.29 | 93.80 |
परभणी | 108.92 | 95.30 |
धुळे | 106.05 | 92.58 |
नांदेड | 108.24 | 94.71 |
रायगड | 105.96 | 92.47 |
अकोला | 106.05 | 92.55 |
वर्धा | 106.56 | 93.10 |
नंदुरबार | 106.99 | 93.45 |
वाशिम | 106. 37 | 93.37 |
चंद्रपूर | 106.14 | 92.70 |
सांगली | 105.96 | 92.54 |
जालना | 107.76 | 94.22 |
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).