Petrol Diesel Price : महागाईच्या गर्तेत काहीसा दिलासा; मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; पेट्रोल 9.50, तर डिझेल 9 रुपयांनी स्वस्त
Petrol Diesel Price Today 22 May 2022 : केंद्र सरकारने अबकारी करामध्ये कपात केल्यानं आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Petrol Diesel Price Today 22 May 2022 : महागाईनं त्रस्त झालेल्या जनतेला मोदी सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरांत पुन्हा कपात (Petrol Diesel Price) केली आहे. केंद्र सरकारनं पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल (Petrol Price) 9.50 रुपयांनी आणि डिझेल (Diesel Price) 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच, देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर रात्री 12 वाजल्यापासून लागू झाले आहेत.
केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरांत केलेल्या कपातीनंतर देशाच्या राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपयांवरुन 95.91 रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेल 96.67 रुपयांवरुन 89.67 रुपयांवर पोहोचलं आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर 120.51 रुपयांवरून 111.01 रुपये प्रति लिटर झाले आहेत. तसेच, डिझेलची किंमत 104.77 रुपयांवरून 97.77 रुपये प्रति लिटर होणार आहे.
केंद्र सरकाच्या मोठ्या निर्णयानंतर केरळ सरकारनंही पेट्रोल-डिझेलवरली स्टेट टॅक्समध्ये घट केली आहे. केरळ सरकारनं पेट्रोलच्या दरांत 2.41 रुपये आणि डिझेलच्या दरांत 1.36 रुपयांची घट केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा देण्यासाठी उत्पादन शुल्क कमी करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, भारत जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आणि आयातदार देश आहे. देशात आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात केलं जातं आणि त्यामुळे किरकोळ इंधनाच्या किमती Import Parity Rates वरुन ठरवल्या जातात.
किती कमी झाला व्हॅट?
सध्या सरकार पेट्रोलवर 27.90 रुपये आणि डिझेलवर 21.80 रुपये उत्पादन शुल्क आकारते. या कपातीनंतर पेट्रोलवर 19.90 रुपये आणि डिझेलवर 15.80 रुपये अबकारी शुल्क लागेल. त्यामुळे देशभरात पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे.
यापूर्वीही उत्पादन शुल्कात करण्यात आली होती कपात
यापूर्वी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबरला केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपयांनी तर डिझेलवर 10 रुपयांनी कपात केली होती. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन विरोधी पक्षशासित राज्यांनी व्हॅट कमी केला नव्हता. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि झारखंड यांनी व्हॅटमधून 11,945 कोटी रुपये कमावले आहेत.
अर्थमंत्र्यांच्या इतर महत्त्वाच्या घोषणा
- पीएम उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरवर यावर्षी 200 रुपये सबसिडी दिली जाणार आहे. एका कुटुंबाला वर्षभरात 12 सिलेंडर मिळतील. 9 कोटी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.
- ज्या उत्पादनांत आपण अनेक गोष्टींत आयातीवर अवलंबून आहोत, तिथे प्लास्टिक उत्पादनांच्या कच्च्या मालावरील उत्पादन शुल्कही कमी करण्यात आलं आहे.
- काही स्टील उत्पादनांच्या कच्च्या मालावरील आयात शुल्कही कमी केलं जाणार आहे. त्याचबरोबर काही पोलाद उत्पादनांवर निर्यात शुल्क आकारण्यात येणार आहे.
- सिमेंटची उपलब्धता वाढवण्यासाठीही उपाययोजना केल्या जात आहेत. उत्तम लॉजिस्टिकमुळे सिमेंटची किंमतही कमी केली जाईल.
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).