एक्स्प्लोर

Petrol Diesel Price : महागाईच्या गर्तेत काहीसा दिलासा; आजही पेट्रोल-डिझेल स्थिर, महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग पेट्रोल

Petrol Diesel Price Today 20 May 2022 : देशात गेल्या 44 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. यापूर्वी 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या.

Petrol Diesel Price Today 20 May 2022 : ऐन महागाईच्या गर्तेत सर्वसामान्यांना सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांपासून दिलासा मिळाला आहे. गेल्या 44 दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) स्थिर आहेत. भारतीय पेट्रोललियम कंपन्यांनी आजचे नवे दर जाहीर केले असून आज दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, आज आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींत घट झाली आहे. तरीही याचा कोणताही परिणान देशांतर्गत बाजारात झालेला नाही. यापूर्वी 6 एप्रिल रोजी पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या किमती (Diesel) वाढल्या होत्या. त्यावेळी पेट्रोलचे दर 80 पैशांनी, तर डिझेलचे दर 80 पैशांनी वाढवण्यात आले होते. 

आजच्या कच्च्या तेलाच्या किमतींवर नजर टाकली तर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. WTI क्रूड 0.42 डॉलर ते 0.38 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 109.47 डॉलरवर व्यापार करत आहे. दुसरीकडे, ब्रेंट क्रूडबद्दल बोलायचं झालं तर, 0.32 डॉलर म्हणजेच, 0.26 टक्क्यांनी वाढल्यानंतर ते प्रति बॅरल 111.84 डॉलरवर व्यवहार करत आहे.

दिल्ली, मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर काय?

आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. सोमवारी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 96.67 रुपये आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 120.51 रुपये, तर एक लिटर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहेत. 

इंडियन ऑईलनं जारी केलेल्या किमतींनुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलची किंमत 91.45 रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्च नंतर सलग 14 वेळा दरवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 10.20 रुपयांनी महाग झालं होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारत जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आणि आयातदार देश आहे. देशात आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात केलं जातं आणि त्यामुळे किरकोळ इंधनाच्या किमती Import Parity Rates वरुन ठरवल्या जातात. दरम्यान, आजही देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात मिळतंय. येथे 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर, आंध्र प्रदेशच्या चित्तूरमध्ये डिझेल 107.68 रुपये प्रति लिटर आहे, तर सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 91.45 रुपये आणि डिझेल 85.83 रुपये लिटर आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar On Eknath Shinde : आता भाजपला एकनाथ शिंदेंची  गरज संपली- विजय वडेट्टीवारABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget