एक्स्प्लोर

Petrol Diesel Prices : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जारी; टाकी फुल्ल करण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Petrol-Diesel Price Today 17th May 2022 : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, आजही देशात इंधनाचे दर स्थिर आहेत.

Petrol-Diesel Price Today 17th May 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर (Petrol-Diesel Price) जारी केले आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशात गेल्या 41 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत सातत्यानं चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किमती 110 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. तरिदेखील पेट्रोल (Petrol Price) -डिझेलचे दर (Diesel Price) स्थिर आहेत. त्यामुळे काही दिवस का होईना सर्वसामान्य लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

मार्च-एप्रिलमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 10.20 रुपये प्रति लिटरची वाढ झाली होती. यापूर्वी 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रत्येकी 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती. दरम्यान, ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल110 डॉलरच्या वर राहिल्यास तेल कंपन्या पुन्हा एकदा किमती वाढवू शकतात.

इंडियन ऑईलनं जारी केलेल्या किमतींनुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलची किंमत 91.45 रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्च नंतर सलग 14 वेळा दरवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 10.20 रुपयांनी महाग झालं होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दिल्ली, मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर काय?

आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. सोमवारी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 96.67 रुपये आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 120.51 रुपये, तर एक लिटर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहेत. 

देशातील महत्त्वाच्या शहरांचे दर काय? 

शहरं  पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 120.51 104.77 
दिल्ली 105.41  96.67
चेन्नई 110.85 100.94 
कोलकाता  115.12 99.83
हैद्राबाद 119.49  105.49 
कोलकाता 115.12  96.83
बंगळुरू  111.09  94.79 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meet CM Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटMaharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special ReportAllu Arjun Gets Bail : अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन; चेंगराचेंगरीप्रकरणी कारवाई Special ReportPriyanka Gandhi Speech : मोदींवर फटकेबाजी... प्रियांका गांधींचं लोकसभेत पहिलं भाषण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
Embed widget