Petrol-Diesel Price : देशातील महानगरांमध्ये आजही पेट्रोल-डिझेल स्थिर; एक लिटरची किंमत काय?
Petrol-Diesel Price Today 14th February 2022 : देशातील महानगरांमध्येही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. यातील सर्वाधिक दर हे मुंबईत आहेत.
Petrol-Diesel Price Today 14th February 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आज (सोमवार) म्हणजेच, 14 फेब्रुवारी रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol-Diesel Rates) कोणताही बदल केलेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी तब्बल 3 महिन्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती (Fuel Price) स्थिर आहेत. तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं बोललं जात आहे. अशातच निवडणुकांनंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा कडाडणार असल्याचं बोललं जात आहे.
निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार?
कच्च्या तेलाच्या भावात 2014 सालानंतर पहिल्यांदाच मोठी वाढ झाली आहे. भारताला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. निवडणुकांनंतर भारतातील पेट्रोल-डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन युक्रेनवर येत्या आठवड्यात आक्रमण करण्याचे आदेश देतील, असा दावा व्हाईट हाऊसने केला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव वधारले आहेत.
देशातील चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुबंई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलची सर्वाधिक किंमत मुंबईमध्ये असून प्रति लिटर 110 रुपयांनी मुंबईत पेट्रोल विकण्यात येत आहे. दिल्लीव्यतिरिक्त कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटर पार पोहोचलं आहे. तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबरपासून या महानगरांतील किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सरकारने 15 जून 2017 पासून बाजारात तेलाच्या किमती लागू केल्या आहेत, ज्यावरून त्यांचे दर दररोज निश्चित केले जातात.
देशात 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत.
महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊयात मुंबई, पुण्यापासून नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत...