एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price Today : कच्चं तेल घसरलं, तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे लेटेस्ट दर जाहीर

Petrol-Diesel Price Today : देशातील तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल (Petrol Prices) -डिझेलच्या (Diesel Prices) दरांत कोणताही बदल केलेला नाही.

Petrol-Diesel Price Today 11th October 2022 : कच्चं तेलाच्या दरांत (Crude Oil Prices) काही दिवसांपूर्वी 9 महिन्यांच्या विक्रमी पातळीवर घट झाली होती. पण, गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरांत वाढ होताना दिसत आहे. किंमती कमी केल्यानंतर ओपेकनं (OPEC) उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींत पुन्हा वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी सकाळी कच्च्या तेलाच्या दरांत घसरण दिसून आली. असं असलं तरी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) मात्र, गेल्या साडेचार महिन्यांपासून स्थिर आहेत. क्रूडच्या किमतीत चढ-उतार होत असतानाही पेट्रोल (Petrol) डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

पेट्रोलचे दर 8 रुपयांनी घटले होते 

मोदी सरकारनं साडेचार महिन्यांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर इंधन दरांत बदल करण्यात आला होता. त्यावेळी देशभरात पेट्रोलची किंमत 8 रुपयांनी कमी झालं होतं. मात्र, त्यानंतर महाराष्ट्र आणि मेघालयमध्ये इंधनाचे दर बदलले. अलीकडेच तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांत कपात केली आहे. 

कच्च्या तेलाचे ताजे दर 

सोमवारी झालेल्या घसरणीनंतर, WTI क्रूडचा नवीन दर प्रति बॅरल 90.64 डॉलरवर पोहोचला. तसेच, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 95.69 डॉलरवर पोहोचलं. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर राज्यात पेट्रोलमध्ये 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपयांची कपात करण्यात आली होती. मात्र, मेघालयमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत दीड रुपयांची वाढ करण्यात आली होती.

देशातील महानगरांतील किमती काय? 

शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
चेन्नई 102.74 रुपये 94.33 रुपये
कोलकाता 106.03 रुपये

92.76 रुपये

राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर 
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर 

दररोज अपडेट होतात पेट्रोल-डिझेलचे दर 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. मात्र, तेल कंपन्यांनी बराच काळ पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल केलेला नाही.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेतDhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषणABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांचं सावध पाऊल, जानेवारीत भारतीय शेअर बाजारातून 44396 कोटी रुपये काढून घेतले, कारण...
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Embed widget