एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price Today : सलग 15व्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; तुमच्या शहरातील दर काय?

Petrol-Diesel Price Today : आज देशात सलग पंधराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरांतील दर...

Petrol-Diesel Price Today, 19 November 2021 : भारतीय तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rates) जारी केले आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. देशात सलग 15व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

भारतीय तेल कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL) नं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत  94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत (Petrol Price) 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत  86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. 

केंद्र सरकारनं दिवाळीच्या एक दिवस आधी पेट्रोलवर 5 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर कपात केली होती. त्यानंतर अनेक राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींपासून दिलासा दिला होता. दरम्यान, अनेक राज्य अशी होती की, ज्यांनी व्हॅटमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. अशातच मंगळवारी राजस्थान सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल 4 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 5 रुपये प्रति लिटरनं स्वस्त करण्यात आलं आहे. 

देशातील अनेक शहरांत एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पार 

मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लद्दाखमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. मुंबईतील पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. 

देशातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price ) काय?

देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
मुंबई  109.98 94.14
दिल्ली 109.69  98.24
कोलकाता  104.67  89.79
चेन्नई  101.40 91.43

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bachchu Kadu : ... तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू, बच्चू कडूंचा महायुतीवर 'प्रहार' ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 29  मार्च 2024Pankaja Munde : नेहमी ऐनवेळी कुणाला तरी उमेदवारी देण्याची विरोधकांवर वेळ येते, पंकजा मुंडेंचा निशाणाDinesh bub : दिनेश बुब यांचा प्रहारमध्ये प्रवेश, शिवसेनेतून बाहेर पण शिवसेना रक्तात : दिनेश बुब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
Sharad Pawar Collar Video :उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
Manoj Jarange Patil : 'संघर्षयोद्धा'चित्रपटात अजय गोगावलेच्या आवाजात हृदयस्पर्शी गाणं
'संघर्षयोद्धा'चित्रपटात अजय गोगावलेच्या आवाजात हृदयस्पर्शी गाणं
Bachchu Kadu on Amravati : आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंनी शड्डू ठोकला
आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंचा निर्धार
Ram Satpute : यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
Embed widget