एक्स्प्लोर

जीएसटी लागू केला तर पेट्रोल 75 आणि डिझेल 68 रुपये होईल : एसबीआयचा अहवाल

पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्यासाठी सरकारवर दबाव वाढत आहे. आता यासाठी विविध प्रकारच्या सूचना येत आहेत. यातचं पेट्रोल-डिझेलला जीएसटी कक्षेत आणण्यासही सांगितले जात आहे.

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्यांचे दर कमी करण्यासाठी सरकारवर प्रचंड दबाव आहे. त्यांच्या वाढलेल्या किंमतीपासून दिलासा मिळावा, यासाठी त्यांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी होत आहे. अलीकडे पंतप्रधान आणि तत्कालीन मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनीही पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा सल्ला दिला होता. या अगोदर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही याबाबत सूचना केली आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याला धर्मसंकट असल्याचे म्हटले आहे. आता एसबीआयचे अर्थशास्त्रज्ञ सौमिकांत घोष म्हणाले की, जीएसटीच्या कक्षेत आणल्यानंतर पेट्रोलची किंमत 75 आणि डिझेलची किंमत 68 रुपयांवर येऊ शकते.

पेट्रोल आणि डिझेल जीएसटीत आले तर जीडीपीचे 0.4% नुकसान सौम्यकांती घोष यांनी आपल्या मूल्यांकनात म्हटले आहे, की पेट्रोल-डिझेल जीएसटीत आले तर राज्य सरकारांचा केवळ एक लाख कोटी रुपयांचा महसूल तोटा होईल जो जीडीपीच्या 0.4 टक्के असेल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 60 डॉलर आणि डॉलर-रुपया विनिमय दर प्रति डॉलर 73 रुपये या आधारे हे मूल्यांकन केले गेले आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही पेट्रोल आणि डिझेलवर कर लावतात. राज्ये त्यांच्या गरजेनुसार पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट लागू करतात. केंद्र अबकारी शुल्क लावतात. यासह केंद्राकडून सेसही लावला जातो. देशातील काही भागात पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचली आहे.

सौदी अरेबियाने भारताची विनंती फेटाळून लावली ओपेकने कच्च्या तेलाच्या उत्पादनावर लागू असलेले नियंत्रण हटविण्याच्या भारताच्या अर्जाकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. भारताने गेल्या वर्षी कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली होती तेव्हा विकत घेतलेल्या कच्च्या तेलाचा वापर करण्यास सौदी अरेबियाने सांगितले आहे. कच्चा तेलाचा सर्वात जास्त वापरात येणाऱ्या ब्रेंट क्रूड ऑईल शुक्रवारी जवळपास एक टक्का वाढून 67.44 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.

खरं तर, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओपेक देशांना क्रूड तेलाच्या किंमतीत स्थिरता आणण्यासाठी उत्पादनावरील निर्बंध कमी करण्याचे आवाहन केले होके. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे आर्थिक क्षेत्रात झालेली सुधारणा आणि मागणी या दोन्ही गोष्टींचा वाईट परिणाम होत असल्याचे प्रधान म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget