Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ, ऐन दिवाळीच्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागलं?
Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाली असताना दुसरीकडे भारतीय इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
Petrol Diesel Price in 23 October 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Prices) गेल्या काही काळापासून वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. अशा परिस्थितीत दिवाळीच्या दिवशी सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलच्या किमतींत दिलासा मिळणार की, त्यांच्या खिशाला कात्री लागली आहे, पाहुयात...
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतरही पेट्रोल-डिझेलच्या दरांत जनतेला दिलासा मिळाला आहे. देशातील सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल (Indian Oil), भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum) यांनी काही प्रकारची दरवाढ केली असून त्यात कोणताही बदल झालेला नाही.
कच्च्या तेलाचे दर काय?
दिवाळीच्या दिवशी म्हणजेच, 24 ऑक्टोबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल सुमारे 88.09 डॉलर आहे. तर ब्रेंट क्रूडनंही वाढ नोंदवली असून ते प्रति बॅरल 93.50 डॉलरवर पोहोचले आहे. काही काळापूर्वी ओपेक या तेल उत्पादक देशांच्या समूहानं तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं वाढ होत आहे.
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रति लिटर आहे. आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 106.35 रुपये, कोलकात्यात 106.03 रुपये आणि चेन्नईमध्ये 102.63 रुपये आहे. डिझेलबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये, मुंबई 94.28 रुपये, कोलकाता 92.76 रुपये आणि चेन्नईमध्ये 94.24 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे.
राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?
नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर
पेट्रोल-डिझेलचे दर कसे पाहाल?
तुम्ही जर बीपीसीएलचे (BPCL) ग्राहक असाल तर पेट्रोल-डिझेलची किंमत तपासण्यासाठी RSP <डीलर कोड> लिहा आणि 9223112222 या क्रमांकावर पाठवा. दुसरीकडे, HPCL ग्राहक HPPRICE <डीलर कोड> लिहून 9222201122 या क्रमांकावर पाठवतात. दुसरीकडे, इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवतात. त्यानंतर तुम्हाला आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती मेसेजद्वारे मिळेल.