Petrol Diesel Price Hike: निवडणुका संपल्या, पेट्रोल-डिझेलच्या दराचा भडका सुरु
Petrol, Diesel Price: देशात तब्बल 66 दिवसांनी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या असून पेट्रोल 15 पैशांनी तर डिझेल 18 पैशांनी महाग झालं आहे. 27 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच ही इंधन दरवाढ झाली आहे.
नवी दिल्ली: देशातल्या पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर लगेचच पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय. तब्बल 66 दिवसांनंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली असून पेट्रोल 15 पैशांनी तर डिझेल 18 पैशांनी वाढलं आहे. 27 फेब्रुवारीनंतर देशात पहिल्यांदाच इंधनाची दरवाढ झाली आहे. मधल्या काळात पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने इंधानांची किंमत 'जैसे थे' ठेवण्यात आली होती असं सांगण्यात येतंय.
या दोन महिन्याच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असूनही देशातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. यामागे सहाजिकच पाच राज्यातील निवडणुका हे कारण होतं. मात्र जशा या निवडणुका संपल्या तसं लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. निवडणुका झाल्यानंतर आता होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे आता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार हे नक्की. या पुढे आता रोज पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचं काही विश्लेषकांकडून सांगण्यात येतंय.
मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात वाढ होऊन ती 96.95 रुपये तर डिझेलची आजची किंमत ही 87.98 रुपये इतकी झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आता 90.55 रुपये इतकं झालं आहे तर डिझेल 80.91 रुपये इतकं झालं आहे.
देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.
महत्वाच्या बातम्या :
- BLOG : निवडणुका जिंकण्यात 'महारथी' असल्याची मोदींची प्रतिमा उध्वस्त, येणारे दिवस कदाचित 'अच्छे दिन'
- Coronavirus Lockdown in India : देशात पुन्हा लॉकडाऊन? टास्क फोर्सची केंद्र सरकारला शिफारस, सुत्रांची माहिती
- Gokul Election Results 2021 : गोकुळ दूध संघावर कोणाची सत्ता? आज निकाल, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला