एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price : आजपासून राज्यात पेट्रोल 5, तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त; इतर महानगरांतील दर 'जैसे थेच'

Petrol-Diesel Price 15th July : राज्यातील जनतेला मोठा दिलासा. राज्य सरकारकडून पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरनं स्वस्त.

Petrol-Diesel Price 15th July : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. आज महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून राज्यात पेट्रोल (Petrol Price) 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरनं स्वस्त झालं आहे. अशातच महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सलग 55व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही. आजही देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेयरमध्ये असून 84.10 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल (Diesel Price) 79.74 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. 

नवनिर्वाचित सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा 

राज्यात आता पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल 5 रुपये आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरनं स्वस्त झालं आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 10 हजार कोटींचा बोजा पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलचे नवीन दर राज्यात लागू करण्यात आले आहेत. 

राज्य सरकारनं केलेल्या दरकपातीनंतर राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. राज्याची राजधानी आणि देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत आज पेट्रोल 106.25 तर, डिझेल 94.22 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. दरम्यान, काल मुंबईत पेट्रोल 111.30 रुपये आणि डिझेल 97.22 रुपये प्रति लिटरनं विकलं जात होतं. 

देशातील महानगरांतील दर काय? 

महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यांत पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 102.63 रुपये तर, डिझेलचा दर 94.24, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रतिलिटर आहे.  

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
Sambhaji Raje: सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून उभा राहीला नाही; संभाजीराजेंचा उद्विग्न सवाल
सर्व परवानग्या नव्हत्या तर मोदींनी शिवस्मारकाचं जलपूजन कसं केलं? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
Rahul Gandhi : राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chembur Fire : चेंबूरमध्ये अग्नितांडव, 7 जणांचा होरपळून मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहितीEknath Shinde Delhi Daura : नक्षलग्रस्त राज्याच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे उदया दिल्ली दौऱ्यावरTop 100 Headlines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट  06 October 2024  ABP MajhaHarshwardhan Patil Join Sharad Pawar : हर्षवर्धन पाटील उद्या राष्ट्रवादीत, शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
Sambhaji Raje: सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून उभा राहीला नाही; संभाजीराजेंचा उद्विग्न सवाल
सर्व परवानग्या नव्हत्या तर मोदींनी शिवस्मारकाचं जलपूजन कसं केलं? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
Rahul Gandhi : राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
S Jaishankar Pakistan Visit : मोदी सरकारमधील मंत्री तब्बल 9 वर्षांनी पाकिस्तानात जाणार, इम्रान खान यांच्या पक्षाने घेतला वेगळाच निर्णय!
मोदी सरकारमधील मंत्री तब्बल 9 वर्षांनी पाकिस्तानात जाणार, इम्रान खान यांच्या पक्षाने घेतला वेगळाच निर्णय!
Pune Police: पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार
पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार "सर्च लाईट"; बोपदेव घाटातील घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
Embed widget