आता पारंपरिक युद्ध नाही तर अणू युद्ध होईल, पाकिस्तानची भारताला पुन्हा धमकी
भारतीय लष्कराने रविवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये नीलम घाटी परिसरात चार दहशतवादी कॅम्प आणि काही पाकिस्तानी सैन्याच्या ठिकाण्यांवर हल्ला केला.
नवी दिल्ली : पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानने रविवारी केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लघनानंतर भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत हल्ला केला होता. यामध्ये 20 हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा झाला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांनी भारताला हा इशारा दिला आहे.
पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी म्हटलं की, यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध होईल. ज्या प्रकारच्या आवश्यकता असेल त्या प्रकारच्या शस्त्रांचा आम्ही वापर करु. पाकिस्तानवर सध्या गंभीर धोका आहे. यावेळी युद्ध झाल्यास पारंपरिक युद्ध होणार नाही, झालं अणू युद्ध होईल. 4-5 दिवस गोळीबार होईल, हवाई हल्ले होतील, नौसेना हल्ला करेल, असं काही होणार नाही.
भारतीय लष्कराने रविवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये नीलम घाटी परिसरात चार दहशतवादी कॅम्प आणि काही पाकिस्तानी सैन्याच्या ठिकाण्यांवर हल्ला केला. भारताच्या या कारवाईत 10 पारिस्तानी सैनिक आणि डझनभर दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज आहे.
पाकिस्तानी रेंजर्सने रविवारी सकाळी तंगधार सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला होता. पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले होते, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला होता.
VIDEO | भारत-पाकिस्तान अणुयुद्ध झालं तर काय घडेल?