Imran Khan | पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान श्रीलंका दौऱ्यावर, भारताने दिली एयर स्पेसच्या वापराची परवानगी
पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) श्रीलंका दौऱ्यावर आहेत. त्यासाठी पाकिस्तानने भारतीय एयर स्पेसचा वापर करण्यासाठी परवानगी मागितली होती.
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भारतीय एयर स्पेसचा वापर करण्यास परवानगी मिळाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे दोन दिवस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी पाकिस्तानने भारतीय एयर स्पेस वापरण्याची परवानगी मागितली होती. तशी परवानगी आता भारताने पाकिस्तानला दिली आहे.
पुलावामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान तणाव वाढला होता. त्यावेळी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किरगिस्तान दौऱ्यासाठी पाकिस्तानने त्यांच्या एयर स्पेसचा वापर करण्यास भारताला परवानगी दिली होती. परंतु जनतेकडून असलेल्या दबावानंतर भारतीय पंतप्रधानांनी आपल्या मार्गामध्ये बदल केला होता.
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांची शांततेची भाषा, पाकिस्तानच्या भूमिकेचं भारताकडून स्वागत
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत तसेच उच्च स्तरीय अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी दोन दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्याने ते श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
या दोन देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान, संरक्षण आणि पर्यटनावर चर्चा होणार आहे. या क्षेत्रातील द्विपक्षीय सरकार्य वाढवण्यावर दोन्ही देशातील पंतप्रधान भर देतील. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने स्पष्ट केलंय की श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे आमंत्रण स्वीकारुन इमरान खान श्रीलंका दौऱ्यावर आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान हे श्रीलंकेच्या संसदेला संबोधित करणार होते. पण श्रीलंकेविरोधाच सुरु असलेला मानवी हक्क संघटनेचा तपास आणि त्यातील भारताची असलेली अत्यंत महत्वाची भूमिका लक्षात घेता श्रीलंकेने इमरान खान यांचे संसदेतील संबोधन रद्द केलं आहे. आपल्या संसदेतील संबोधनादरम्यान इमरान खान काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती होती. त्यामुळे भारताची संभाव्य नाराजी लक्षात घेता श्रीलंकेने आपली भूमिका बदलली.
...मग काय जय श्रीराम पाकिस्तानमध्ये म्हटलं जाणार, अमित शाहंचा सवाल