Pakistan attack on India PBKS vs DC Match: पाकिस्तानचा ड्रोन हल्ला, धर्मशालात ब्लॅकआऊट, दिल्ली विरुद्ध पंजाबची मॅच अर्ध्यातच थांबवली
Pakistan attack on India PBKS vs DC Match: भारताच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे एफ 16 आणि जेएफ 17 ही दोन अत्याधुनिक विमाने पाडण्यात आली आहेत. पाकिस्तानचा जोरदार हवाई हल्ला

Pakistan Attack on India: भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने गेल्या 24 तासांमध्ये दुसऱ्यांदा भारतावर हवाई हल्ला चढवला आहे. सीमारेषेलगत असलेल्या जम्मू-काश्मीर आणि राजस्थानमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून (Pakistan Army) ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवण्यात आला आहे. याचा फटका हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतील सामन्याला बसला आहे. धर्मशालात आज पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामना होता. या सामन्यात पंजाबने (PBKS vs DC Match) नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली होती. हा सामना सुरु असताना दहाव्या षटकात पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे धर्मशालात (Dharmashala) अचानक ब्लॅकआऊट करण्यात आला. त्यामुळे धर्मशाला येथील मैदानातील फ्लडलाईटस् बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामना थांबवण्यात आला आहे. पाकिस्तानकडून सध्या सीमारेषेच्या परिसरात एकापाठोपाठ एक जोरदार हल्ले सुरु आहेत.
पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेपलीकडून क्षेपणास्त्रं आणि ड्रोनद्वारे हल्ले केले जात आहेत. मात्र, भारतीय सैन्याने सीमारेषेच्या भागात तैनात केलेल्या एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम, एल 70 आणि शिल्का या अँटी एअरक्राफ्ट गन्सने पाकिस्तानचा हल्ला परतवून लावला आहे. जैसलमेर, पठाणकोट, कछ भागात पाकिस्तानी डागलेली क्षेपणास्त्रंही भारतीय सैन्याने पाडली आहेत. आतापर्यंत पाकिस्तानची 8 क्षेपणास्त्रं भारतीय सैन्याने पाडल्याची माहिती आहे. याशिवाय, उरी आणि पोखरण परिसरात भारत आणि पाकिस्तानी सैन्याकडून एकमेकांवर जोरदार गोळीबार सुरु असल्याची माहिती
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे भारताच्या तिन्ही सैन्यदलांच्या संपर्कात आहेत. संरक्षणमंत्री आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सध्या चर्चा सुरु आहे. पाकिस्तानने भारतातील नागरी वस्ती असलेल्या भागांवर हल्ला चढवल्याने आता युद्धाला तोंड फुटले आहे. त्यामुळे आता भारत या हल्ल्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार हे बघावे लागेल.
जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, होशियारपूरवर पाकिस्तानचा हल्ला
जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर या ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आलं असून भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली आहे. भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन पाडल्याची माहिती समोर आली आहे. जम्मूतील विमानतळ हे पाकिस्तानचे लक्ष्य होतं अशी माहिती समोर येत आहे.
आणखी वाचा























