दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले सुबोध पाटील यांची घरवापसी, शेजाऱ्यांनी केलं जंगी स्वागत
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पनवेल येथील पर्यटक सुबोध पाटील हे जखमी झाले होते. त्यांचे मानेला दहशतवाद्यांची गोळी चाटून गेली होती. उपचारानंतर ते आज त्यांच्या घरी आले आहेत.

Pahalgam Terror Attack : 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश होता. तर अनेकजण जखमी झाले होते. दरम्यान, याच दहशतवादी हल्ल्यात पनवेल येथील पर्यटक सुबोध पाटील हे जखमी झाले होते. त्यांचे मानेला दहशतवाद्यांची गोळी चाटून गेली होती. दरम्यान, उपचारानंतर आज सुबोध पाटील यांची घरवापसी झाली आहे. ते कामोठे येथील त्यांच्या घरी दाखल झालेत.
दहशतवाद्यांनी मारलेली गोळी सुबोध पाटील यांच्या मानेला चाटून गेली होती. त्यानंतर त्यांच्यावर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये इतके दिवस उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची कामोठे इथल्या घरी वापसी झाली आहे. त्यांच्या रॉयल हाईट्स सोसायटीमधील शेजाऱ्यांनी त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे जंगी स्वागत केल्याचं पाहायला मिळालं.
चहा टपरीत लपलेले असताना सुबोध पाटील यांच्या मानेला गोळी चाटून गेली
महाराष्ट्रातील पनवेल येथील सुबोध पाटील आणि माणिक पाटील हे 40 जणांच्या ग्रुप सहित या हल्ल्यात सापडले होते. त्यातील एका पर्यटकाला उर्दू भाषेतील पुस्तक वाचायला न आल्याने दहशतवाद्यानी ठार मारले होते. तर एका चहा टपरीत लपलेले असताना सुबोध पाटील यांच्या मानेला गोळी चाटून गेली होती. दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांना इंडियन आर्मी 92 बेस हॉस्पिटल पेहलगाम इथं भरती करण्यात आलं होतं. अखेर सुबोध पाटील यांच्यावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. ते आज आपल्या कामोठे येथील घरी दाखल झाले. यावेळी त्यांच्या शेजाऱ्यांनी जंगी स्वागत केल्याचं पाहायला मिळालं.
22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा निर्घृणपणे बळी गेला होता. 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा या भागातील सर्वात प्राणघातक हल्ला मानला जात आहे. भारत सरकार आणि भारतीय सशस्त्र दलांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शत्रूंना स्पष्ट संदेश दिला आहे की आता दहशतवादाविरोधातील कारवाई कोणत्याही स्तरावर मर्यादित राहणार नाही. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हालचालींना वेग आला आहे. भारतीय नौदलाची जहाजे दीर्घ पल्ल्याच्या अचूक हल्ल्यासाठी त्यांच्या क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्र प्रणालीची सतत चाचणी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या तिघांचे डोंबिवलीत स्मृतीस्थळ उभारणार, 4 मे रोजी अधिकृत घोषणा करणार

























