एक्स्प्लोर

Pahalgam : दहशतवादी हल्ल्यामध्ये 'संधी' शोधण्याचा विमान कंपन्यांचा नालायकपणा, दिल्लीपर्यंतचे 15 हजारांचे तिकीट दर 65 हजारांवर नेलं

Pahalgam Terror Attack : एकीकडे दहशतवादी हल्ल्यामुळे लोक भयभीत, असहाय्य झाले असताना दुसरीकडे विमान कंपन्यांनी मात्र त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेतल्याचं दिसून आलं. 

नवी दिल्ली : एकीकडे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack ) 26 पर्यंटकांनी जीव गमावला, देश दुःखात बुडाला... त्याचवेळी दुसरीकडे देशातील विमान कंपन्यांनी (Flight Company) या हल्ल्यामध्ये संधी शोधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं. श्रीनगर ते नवी दिल्ली या मार्गावरील नेहमीचे विमान तिकीट (Shrinagar To Delhi Flight Ticket Rate) हे 12 ते 15 हजार इतके असते. मात्र हल्ल्यानंतर पर्यटकांची आगतिकता पाहता विमान कंपन्यांनी तिकीट दर 65 हजारांपर्यंत नेले. यावरुन देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. 

आधीच संकटात सापडलेल्या पर्यंटकांसमोर विमान कंपन्यांनी त्यांची लायकी दाखवत आणखी एक संकट उभं केलं. श्रीनगरहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात चौपट ते पाचपट वाढ करत फायदा कमावण्याचा प्रयत्न केला. 

पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगर ते दिल्ली आणि इतर शहरांच्या विमान तिकिटांच्या किमतीत अचानक वाढ झाली होती. 26 पर्यटकांचा बळी घेणाऱ्या हल्ल्यानंतर, संकटातून बाहेर पडण्यासाठी गर्दी झाली होती. त्याचा फायदा घेऊन विमान कंपन्यांनी तिकीट दरात अनेक पट वाढ केली होती.

हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, श्रीनगर ते दिल्ली एक मार्गी विमान तिकिटाची किंमत 65,000 रुपयांपर्यंत गेली होती. सामान्य दिवसांमध्ये त्याच तिकिटांची किंमत ही 12,000 ते 15,000 रुपयांदरम्यान होती. उदाहरणार्थ, स्पाईसजेटचे 24 एप्रिलचे फ्लाइटचे भाडे 28,800 रुपये होते. तर त्याच विमानाचे दर हे इतर दिवशी 14,600 रुपये आहे. इंडिगो फ्लाइटचे दरही पुन्हा 15,000 रुपयांवर आणण्यात आले आहेत.

 

विमान कंपन्यांनी 4 ते 5 पटीने दरवाढ केली

अचानक झालेल्या या वाढीमुळे सोशल मीडियावर लोक संतापले. बऱ्याच वापरकर्त्यांनी एअरलाइन्सवर 'देश संकटात असताना नफा कमावण्याचा' आरोप केला. एका यूजरने लिहिले की, श्रीनगर-दिल्ली फ्लाइटचे भाडे नेहमीपेक्षा 4 ते 6 पटीने जास्त आहे. हा संकटाचा काळ आहे आणि अशा परिस्थितीत खाजगी क्षेत्रात खुलेआम लूट सुरू आहे.

हे दहशतवादी हल्ल्यापेक्षा भयंकर

अनेक युजर्सने सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आणि हे दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयंकर असल्याचे म्हटले. संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला असताना विमान कंपनी अपघातग्रस्तांकडून मनमानी भाडे आकारत आहेत. 

सोशल मीडियावर वाढता दबाव आणि प्रवाशांच्या तक्रारींनंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना भाडे नियंत्रित करण्याचे आणि अतिरिक्त उड्डाणे चालवण्याचे निर्देश दिले. यानंतर एअर इंडिया आणि इंडिगोने श्रीनगर ते दिल्ली आणि मुंबईसाठी अतिरिक्त उड्डाणे जाहीर केली. याव्यतिरिक्त, एअरलाइन्स 30 एप्रिलपर्यंत तिकीट रद्द करणे आणि संपादन शुल्कावर सूट देत आहेत.

पहलगाम हल्ल्यामुळे आणि त्यानंतरच्या घटनांमुळे काश्मीरच्या पर्यटन उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक व्यापारी आणि मार्गदर्शकांनी या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेची मागणी करण्यासाठी मोर्चे काढले. पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला हा मोठा धक्का आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Embed widget