Shehbaz Sharif: भारताने पाणी अडवताच पाकिस्तान बेचैन; पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची तोडीस तोड उत्तर देण्याची भाषा
सिंधू नदीचे पाणी अडवल्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला जाणार असल्याने पाकिस्तानी नेते असे वक्तव्य करताना दिसत आहेत. बेताल वक्तव्यांमधून पाकिस्तानची बेचैनी दिसून येत आहे.

Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू नदी कराराला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरलेला आहे. पाणी तोडणे ही युद्धकृती असल्याचं पाकिस्तानी मंत्र्यांनी म्हटल्यानंतर पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहाबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी भारताच्या राजनैतिक कारवाई विरोधाचा सूर लावला. भारताने पाणी अडवलं तर संपूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देऊ. भारताच्या प्रत्येक हल्ल्याला तोडीस तोड उत्तर देण्याची भाषा पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ करत आहेत. लष्कराच्या कार्यक्रमात शहाबाद शरीफ बोलत होते. (Indus Water Treaty)
खाण्यापिण्याचे वांधे असलेल्या पाकिस्तानकडून आता भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीने धमक्या दिल्या जात आहेत. पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांच्या बेताल वक्तव्यांमधून पाकिस्तानची बेचैनी दिसून येत आहे. सिंधू नदीचे पाणी अडवल्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला जाणार असल्याने पाकिस्तानी नेते असे वक्तव्य करताना दिसत आहेत.
पाकिस्तानची बेचैनी वाढली, भारताला धमक्या
पहलगाम हल्ल्यात इस्लामाबादच्या भूमिकेबाबत भारताच्या आरोपांवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी भारताचे सर्व आरोप फेटाळून लावत हे कोणत्याही विश्वासार्ह तपास व पुराव्याशिवाय केले गेले असल्याचे म्हटलं. भारताकडून आरोपांची मालिका थांबवली पाहिजे आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्याचे आवाहन करत शरीफ सरकारने हल्ल्याचा निषेध केला. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या लष्कर ए तोयबाची छाया असणाऱ्या द रेजिस्टन्स फोर्सचे म्होरके पाकिस्तानात मोकाट फिरत आहेत. यावेळी पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारताला त्यांचा देश कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असल्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानी पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांनी सिंधूत पाणी नसेल तर रक्त वाहील असा इशारा दिलाय.
काय म्हणाले शाहबाज शरीफ?
शाहबाज शरीफ म्हणाले भारताने आरोप प्रत्यारोप थांबवावेत आणि भारताच्या कोणत्याही कृतीला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर जाईल यावर शरीफ यांनी भर दिला. पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचे उपस्थितीत ते बोलत होते. पाकिस्तानला शांतता हवी आहे पण ही इच्छा आमचा कमकुवतपणा मानू नये. सिंधू नदीचे पाणी थांबवले तर आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ असे शहाबाज शरीफ म्हणाले.
पाकिस्तानी सैन्याला सज्ज राहण्याचे आवाहन
दरम्यान पाकिस्तानी पंतप्रधानांनी पहलगाम हल्ल्याच्या तटस्थ चौकशीत सहभागी होण्याबद्दल तयारी दाखवली. इस्लामाबाद कोणत्याही तटस्थ पारदर्शक चौकशीत सहभागी होण्यास तयार आहे परिस्थिती काहीही असो त्यांचा देश कधीही आपल्या सन्मानाची तडजोड करणार नाही. यावेळी शहाबाद शरीफ यांनी 2019 च्या बालाकोट हल्ल्याचा आणि पाकिस्तानच्या प्रत्युत्तराच्या कारवाईचा ही उल्लेख केला. शहाबाद म्हणाले की पाकिस्तानने जोरदार प्रत्युत्तर देऊन आपली लष्करी क्षमता आधीच सिद्ध केली आहे. भविष्यात होणाऱ्या कोणत्याही दुर्दैवी घटनेला अशाच प्रकारची प्रतिक्रिया मिळेल अशी धमकीही त्यांनी दिली. पाकिस्तानी सैन्याला देशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पाकिस्तानमध्ये पाणीटंचाई निर्माण होणार (India-Pakistan Water Dispute)
पाकिस्तानची 80 टक्के शेती सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे. आता भारताने या नद्यांचे पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानमधील पाणी संकट अधिकच वाढेल. तिथली आर्थिक परिस्थिती बिघडेल. याशिवाय, पाकिस्तान अनेक धरणे आणि जलविद्युत प्रकल्पांमधून वीज निर्मिती करतो. पाण्याच्या कमतरतेमुळे वीज निर्मितीत घट होऊ शकते, ज्यामुळे आर्थिक आणि औद्योगिक घडामोडींवर परिणाम होईल.
हेही वाचा:























