एक्स्प्लोर

सिंधू घाटीत एकतर पाणी वाहणार किंवा त्यांचे रक्त; बिलावल भुट्टोंची भारताला धमकी; उपासमारीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या नुसत्याच वल्गना

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी आक्रमक आणि चिथावणीखोर विधाने करून सिंधु करारच्या निर्णयावरुन भारताला धमकी दिली आहे.

Pakistan On Pahalgam Terror Attack:  काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) देशासह जगभरात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच भारत- पाकिस्तान या दोन्ही देशातील राजनैतिक तणाव दिवसागणिक आणखी वाढत चालला आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथील बैसरन येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्यात 26 निष्पाप लोकांचा मृत्यू झालाय. तेव्हापासून, केवळ देशातूनच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या हल्ल्यानंतर भारत सरकारनेही पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली आणि सिंधू पाणी करार बंद करण्यासारखे अनेक मोठे निर्णय घेतले. यादरम्यान, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) यांनी आक्रमक आणि चिथावणीखोर विधाने करून ही परिस्थिती अधिक गंभीर केली आहे.

एका जाहीर सभेला संबोधित करताना बिलावल भुट्टो यांनी सिंधू पाणी कराराबाबत भारताला थेट धमकी दिली. ते म्हणाले, "मला सिंधू नदीच्या काठावर उभे राहून भारताला सांगायचे आहे की सिंधू आमची आहे आणि ती आमचीच राहील. एकतर आमचे पाणी या नदीतून वाहेल किंवा त्यांचे रक्त त्यातून वाहेल." हे विधान भारताविरुद्ध हिंसाचाराला उघडपणे चिथावणी देणारे म्हणून पाहिले जात आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा पहलगाम हल्ल्याने संपूर्ण देशाला दुःखांच्या  सागरात लोटले असताना आणि जगभरात संतापाची लाट असताना असे वक्तव्य पाकिस्तानच्या नक्कीच अंगलट येईल, असे बोलेल जात आहे.

सिंधू पाणी कराराला भारताकडून स्थगिती 

भारताने 1960च्या जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेल्या सिंधू पाणी कराराचा (IWT) पुनर्विचार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा करार भारत आणि पाकिस्तानमधील पाणीवाटपाबाबतचा एक ऐतिहासिक करार आहे, जो दोन युद्धांमध्येही अबाधित राहिला. परंतु सततच्या दहशतवादी कारवाया आणि पाकिस्तानच्या असहकार्य भूमिकेमुळे भारताने आता ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

बिलावल भुट्टो यांच्या नुसत्याच वल्गना, भारताव आरोपांच्या फैरी 

पाकिस्तानी नेते भुट्टो यांनी दावा केला की भारताने "सिंधूवर हल्ला केला". ते म्हणाले की, भारताची लोकसंख्या आपल्यापेक्षा जास्त असू शकते, पण पाकिस्तानचे लोक धाडसी आहेत. आम्ही सीमेवर आणि पाकिस्तानच्या आतही लढू. आमचा आवाज भारताला योग्य उत्तर देईल. या विधानावरून हे स्पष्ट होते की दहशतवादाचा निषेध करण्याऐवजी, पाकिस्तानचे राजकीय नेतृत्व आक्रमक राष्ट्रवादाला प्रोत्साहन देत आहे, ज्यामुळे राजनैतिक चर्चेच्या शक्यता आणखी कमी होत चालल्या आहेत.

भारताची राजनैतिक कणखरता

पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने अनेक ठोस पावले उचलली आहेत. यामध्ये केवळ पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे आणि त्यांच्या हद्दपारीचे आदेशच नाहीत तर सिंधू पाणी करार कायमचा रद्द करण्याच्या दिशेने पावले देखील समाविष्ट आहेत. भारत जागतिक बँकेसोबत या कराराचा नव्याने आढावा घेत आहे.

हे ही वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Rahul Gandhi on PM Modi: तीन भारतीय नौसैनिकांच्या हत्येनंतरही कोणता खेद नाही, माफी नाही; उलट, अमेरिका आदेश देत आहे, आज्ञाधारक पीएम नोकराप्रमाणे ऐकतात आणि आदेश पाळतात, राहुल गांधीचा बोचरा वार
तीन भारतीय नौसैनिकांच्या हत्येनंतरही कोणता खेद नाही, माफी नाही; उलट, अमेरिका आदेश देत आहे, आज्ञाधारक पीएम नोकराप्रमाणे ऐकतात आणि आदेश पाळतात, राहुल गांधीचा बोचरा वार
Donald Trump : अमेरिका- इराण करारावर आज स्वाक्षरी होणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा,  इराणच्या भूमिकेनं नवा ट्विस्ट...
अमेरिका- इराण करारावर आज स्वाक्षरी होणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराणनं वेगळीच भूमिका मांडली
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू
होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांचे आदेशांचे पालन करा, नाकेबंदी तोडल्यास कारवाई केली जाईल; आंतरराष्ट्रीय पाण्यातही अमेरिकेचा भारताला सज्जड दम, तीन दिवसात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Embed widget