एक्स्प्लोर

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास करणाऱ्या NIA मध्ये कशी मिळतो नोकरी? नेमका किती मिळतो पगार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया  

देशभरातील तरुणांमध्ये एनआयएबद्दल उत्सुकता वाढली आहे. एनआयएमध्ये नोकरी कशी मिळते? त्यासाठी किती शिक्षण हवे? यासाठी किती अभ्यास आवश्यक आहे? जाणून घेऊयात याबाबतची माहिती.

Pahalgam Terror Attack :  जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack ) 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्या, या घटनेनंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास संस्था (NIA ) चर्चेत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश एनआयएला देण्यात आले आहेत. त्यानंतर एजन्सीने तपास सुरू केला आहे. अशा परिस्थितीत देशभरातील तरुणांमध्ये एनआयएबद्दल उत्सुकता वाढली आहे. एनआयएमध्ये नोकरी कशी मिळते? त्यासाठी किती शिक्षण हवे? यासाठी किती अभ्यास आवश्यक आहे? कोणती परीक्षा द्यावी लागेल? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

एनआयए म्हणजे काय? नेमकं काय करते काम?

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ही भारत सरकारची एक केंद्रीय तपास संस्था आहे. जी 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर 2009 मध्ये स्थापन झाली आहे. त्याचे मुख्य काम दहशतवाद, बनावट चलन, अंमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी आणि संघटित गुन्हेगारी यासारख्या प्रमुख प्रकरणांचा तपास करणे आहे.

एनआयएमध्ये नोकरी कशी मिळवायची?

एनआयएमध्ये अधिकारी होण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. एसएससी सीजीएल परीक्षेद्वारे, जी उपनिरीक्षक पदाकडे जाते. यूपीएससी परीक्षेद्वारे, आयपीएस, आयआरएस सारख्या पदांसाठी निवड होऊ शकते आणि एनआयएमध्ये पोस्टिंग मिळू शकते. याशिवाय, जे आधीच कोणत्याही कायदा अंमलबजावणी संस्थेत काम करत आहेत ते देखील बदली किंवा प्रतिनियुक्तीद्वारे एनआयएमध्ये सामील होऊ शकतात.

एसएससी सीजीएल परीक्षा प्रक्रिया काय आहे?

एसएससी सीजीएल परीक्षा चार टप्प्यात घेतली जाते (टियर 1 ते टियर 4). सर्व टप्पे पार केल्यानंतर, शारीरिक चाचणी आणि मुलाखत असते. एनआयएमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर यशस्वी उमेदवारांना उपनिरीक्षक सारख्या पदांवर नियुक्त केले जाते.

एनआयए अधिकाऱ्यांना किती मिळतो पगार? 

एनआयएमध्ये उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या अधिकाऱ्याला सुरुवातीचा पगार सुमारे 56100 रुपये मिळतो. याशिवाय, केंद्रीय भत्ते, प्रवास सुविधा, घरभाडे भत्ता आणि विशेष जोखीम भत्ता देखील उपलब्ध आहे. शिवाय, उच्च पदांवर पगार आणि सुविधांमध्ये आणखी वाढ होते.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास आता तीव्र झाला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले होते. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) पथक आता जम्मूमध्ये पोहोचले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या:

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामागील सूत्रधार कोण? NIAचं पथक पोहचलं जम्मूत; तुरुंगातील दोन दहशतवाद्यांच्या साथीदारांची कसून चौकशी! 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Embed widget