Pahalgam Terror Attack : पाण्याच्या थेंबा-थेंबाला पाकिस्तान तरसणार! सिंधू करार रद्द करण्याचा भारताचा प्लॅन तयार, तीन टप्प्यात होणार पाकचा करेक्ट कार्यक्रम
India Suspends Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप करार तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आल्याचं पत्र भारताने पाकिस्तानला लिहिलं आहे. पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला पोसतोय असा आरोपही करण्यात आला.

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून आता पाकिस्तानची कोंडी करण्याची तयारी सुरू असून त्यामध्ये ऐतिहासिक सिंधू पाणी वाटप करार (Indus Water Treaty) रद्द करण्याचा मोठा निर्णय भारताने घेतला आहे. या करारानुसार सिंधू नदीच्या 80 टक्के पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार असून आता तो संपणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या निवासस्थानी सिंधू पाणी वाटप करार स्थगित करण्याबाबत बैठक झाली. अमित शहांनी केंद्रीय जल ऊर्जा मंत्री सीआर पाटील यांच्यासोबत 45 मिनिटे चर्चा केली.
पाण्याचा थेंबही पाकिस्तानला मिळणार नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्काळ, मिड टर्म आणि लाँग टर्म अशा तीन टप्प्यामध्ये हा कार्यक्रम आखला जाणार आहे. या तीनही टप्प्यात कोणती पाऊले उचलायची यावर विचार करण्यात आला. या माध्यमातून पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाऊ देऊ नये असा सरकारचा स्पष्ट हेतू आहे. बैठकीनंतर पाणी अडवण्यासाठी शक्य असलेल्या सर्व पद्धतींवर तातडीने काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिशेने तातडीने पावले उचलण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
यापूर्वी जलशक्ती मंत्रालयाचे सचिव देवश्री मुखर्जी यांनी पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाचे सचिव सय्यद अली मुर्तजा यांना पत्र लिहिले होते. पत्राद्वारे त्यांनी सिंधू पाणी वाटप करार तात्काळ स्थगित करण्याच्या निर्णयाची औपचारिक माहिती पाकिस्तानला दिली.
पाकिस्तानकडून पाणी वाटप कराराचे उल्लंघन
भारताच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ, स्वच्छ ऊर्जा विकासाची गरज लक्षात घेता पाणी वाटपाच्या करारामध्ये बदल अपेक्षित आहे असं या पत्रात लिहलं आहे. तसेच पाकिस्तानने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.
पाकिस्तानकडून दहशतवादाला प्रोत्साहन
पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेपलीकडील दहशतवादाचे समर्थन करणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे सुरक्षेची अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी भारताला कराराच्या अंतर्गत त्याच्या अधिकारांचा पूर्णपणे वापर करण्यास अडथळा निर्माण झाला आहे. शिवाय, या कराराअंतर्गत वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याच्या भारताच्या विनंतीला पाकिस्तानने प्रतिसाद दिला नाही, जे कराराचे पूर्ण उल्लंघन आहे असंदेखील या पत्रात म्हटलं आहे.
देवश्री मुखर्जी यांनी पत्रात स्पष्ट केले होते की, हा करार स्थगित करण्याचा निर्णय भारत सरकारने सखोल विचारविमर्शानंतर घेतला आहे. भारत सरकारने निर्णय घेतला आहे की सिंधू जल करार 1960 तत्काळ प्रभावाने निलंबित केला जाईल.
ही बातमी वाचा:























