एक्स्प्लोर

India Vs Pakistan War: खोटारड्या वल्गना अन् शस्त्रागार रिकामं; भारतासोबत युद्धाची दर्पोक्ती करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराची पोलखोल

India Vs Pakistan War: भारतासोबतच्या तणावाच्या काळात पाकिस्तानी सैन्यातही मनोबल घसरल्याच्या बातम्या आल्या आहेत. व्हायरल झालेल्या एका पत्रात मोठ्या संख्येने लोक सैन्यातून राजीनामा मागत असल्याचे सांगितले आहे. याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

India Vs Pakistan War: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारताने लष्करी आणि राजनैतिक पातळीवर कठोर पावले उचलली आहेत. त्याच वेळी, पाकिस्तानचा प्रतिसाद केवळ परमाणु धमक्या, सोशल मीडियावरील दिशाभूल करणारा प्रचार आणि राजनैतिक वक्तव्ये यांच्यापुरता मर्यादित राहिल्याचं चित्र आहे. पाकिस्तानचे सैन्य आधीच धोरणात्मकदृष्ट्या एकाकी पडले आहे. पाकिस्तानचे सैन्य आधीच धोरणात्मकदृष्ट्या एकाकी पडल्याची चर्चा आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि अंतर्गतरित्या विभाजित झाल्याचंही बोललं जातंय. कोणत्याही प्रकारच्या लष्करी संघर्षाला हाताळण्याच्या स्थितीत ते नाहीत. असं असूनही, ते सोशल मीडिया आणि काही देशांतर्गत मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे खोट्या लष्करी तयारीचा प्रचार करत आहे.

अलिकडेच, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर नियंत्रण रेषेवरील आघाडीच्या रेषांची पाहणी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, जो सोशल मीडियावर 2022 मधील जुने फुटेज असल्याचे सांगत फेटाळून लावण्यात आला होता. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने याला जाणीवपूर्वक केलेला प्रचार म्हटले आहे. भारताने याबाबत बोलताना म्हटलं, पाकिस्तानमधील जनतेचा कमी होत चाललेला विश्वास परत मिळवण्यासाठी हा केवळ एक केविलवाणा प्रयत्न आहे.

29 एप्रिल रोजी पाकिस्तान हवाई दलाने प्रसिद्ध केलेल्या एका प्रमोशनल व्हिडिओमध्ये रशियाच्या एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली, स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेट आणि अगदी कॉल ऑफ ड्यूटी व्हिडिओ गेममधील व्हिडिओ दाखवण्यात आले होते. पाकिस्तानकडे यापैकी काहीही नाही. या हास्यास्पद व्हिडिओला सोशल मिडिया युजरनी  X वरील ट्रोल केले आणि त्यानंतर त्यांना त्या पोस्टखालील कमेंट सेक्शन बंद करावं लागलं.

पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी

हलगाम हल्ल्याच्या आठ दिवसांनंतर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा निषेध केला. तसेच, पाकिस्तान युद्धाला सुरुवात करणार नाही, पण भारताने आमच्यावर हल्ला केला, तर आम्ही त्याचा संपूर्ण शक्तीनिशी सामना करू आणि दुप्पट गतीने प्रत्युत्तर देऊ, अशी पोकळ धमकी त्यांनी दिली. एकीकडे पाकिस्तानचे वरिष्ठ मंत्री अणुहल्ल्याची धमकी देतात, तर दुसरीकडे पंतप्रधान शाहबाज शरीफ निष्पक्ष चौकशीचे आवाहन करतात. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास अणुहल्ल्याचा पर्याय समोर असल्याची थेट धमकी दिली. त्याच वेळी, भारताकडून संभाव्य लष्करी कारवाईची भीती असल्याने पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने आंतरराष्ट्रीय समुदायाला मध्यस्थीचे आवाहन केले. परंतु अमेरिका, ब्रिटन आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसारख्या प्रमुख देशांनी कोणत्याही थेट हस्तक्षेपाला नकार दिला आहे आणि फक्त संयम राखण्याचा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानी सैन्याचे घसरतंय मनोबल

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी सैन्यातही मनोबल घसरल्याच्या बातम्या आल्या आहेत. व्हायरल झालेल्या एका पत्रात मोठ्या संख्येने लोक सैन्यातून राजीनामा मागत असल्याचे सांगितले आहे. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, हे वृत्त देखील पाकिस्तानने नाकारलेलेही नाही. त्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले. 

पाकिस्तानचे लष्करी बजेट

पाकिस्तानचे लष्करी बजेट फक्त 7.6 अब्ज डॉलर्सवर अडकले आहे, जे भारताच्या तुलनेत खूपच नगण्य आहे. तज्ज्ञांच्या मते, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या सक्तीच्या लष्करी तैनातीचा खर्च दररोज 15-30 लाख डॉलर्स इतका होत आहे. हा त्यांच्या कमकुवत परकीय चलन साठ्याला आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का आहे.

भारताची विचारपूर्वक आखलेली रणनीती

भारताने या बाबतीत ठोस आणि संयमी पावले उचलली आहेत. याबाबत बैठका, चर्चा, विचारविनीयम भारतात सुरू असताना मात्र,  दुसरीकडे पाकिस्तानचा प्रचार, अणुहल्ल्याची धमकी आणि अंतर्गत असंतोष यामुळे त्याची स्थिती सतत कमकुवत होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget