एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack : स्वतःचा जीव धोक्यात घालून आमचे प्राण वाचवले, नजाकत भाईंच्या उपकाराची परतफेड कधीही करू शकणार नाही; पहलगाम हल्ल्यानंतर भाजप नेत्याची पोस्ट चर्चेत

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी स्थानिक रहिवासी नजाकत अली यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे प्राण वाचवले.

Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील (Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे मंगळवारी (दि. 22) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा छत्तीसगडमधील (Chhattisgarh) चिरमिरी येथील चार कुटुंबांचा एक गट पहलगाममध्ये उपस्थित होता. परंतु स्थानिक रहिवासी नजाकत अली यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या लोकांचे प्राण वाचवले. आता यातून बचावलेले भाजप (BJP) नेते अरविंद अग्रवाल (Arvind Agrawal) यांनी नजाकत अली यांचे फेसबुकवर (Facebook) पोस्ट करत विशेष आभार मानले आहेत. 

छत्तीसगड येथील अरविंद अग्रवाल हे भाजप युवा मोर्चाशी संबंधित आहेत आणि भाजपचे सक्रिय सदस्य आहेत. मंगळवारी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा अरविंदचे कुटुंब एका गटासह काश्मीरला गेले होते. या हल्ल्यादरम्यान, नजाकत अली (Nazakat Ali) हे अग्रवाल यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींना काश्मीरच्या दौऱ्यावर घेऊन गेले होते. नजाकत अली यांनी  स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वांचे प्राण वाचवले आहेत. 

उपकाराची परतफेड कधीच करू शकणार नाही

अरविंद अग्रवाल यांनी आता घरी पोहोचल्यानंतर नजाकत अली यांचे विशेष आभार मानले आहेत. अरविंद अग्रवाल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर लिहिले की, "तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून आमचे प्राण वाचवले. नजाकत भाईंच्या उपकाराची परतफेड आम्ही कधीही करू शकणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, काश्मीर जे आपले आहे ते आपल्या सर्वांचे आहे, मी लवकरच परत येईन, असे त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे. 

भाजप नगरसेवकाचाही जीव वाचला

दरम्यान, या हल्ल्यात नजाकत अली यांनी केवळ अरविंद अग्रवाल (Arvind Agrawal) आणि त्यांच्या कुटुंबाचे प्राण वाचवले नाहीत तर चिरमिरी महानगरपालिकेच्या भाजप नगरसेवक पूर्वा स्थापक (Purva Sthapak) आणि त्यांचे पती कुलदीप स्थापक (Kuldeep Sthapak) यांचेही प्राण वाचवले आहे. यानंतर, नजाकत अली यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पहलगामध्ये हॉटेल, गाडी मालकानं पैसा घेतला नाही, ड्रायव्हर रडला, पण दिल्ली-श्रीनगर विमान तिकीट 38 हजार; 'धर्म पुछा, जाति नही' म्हणणाऱ्यांना प्रत्यक्षदर्शी अमरेंद्र कुमार सिंहांची चपराक

Pakistan on Indus Waters Treaty : जर भारताने सिंधू नदीचे पाणी रोखल्यास तर ती युद्धखोरी असेल! नाक दाबताच पाकिस्तानचे तोंड उघडले; पाकिस्तान काय म्हणाला? शब्द जसाच्या तसा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Embed widget