एक्स्प्लोर
राष्ट्रपतींच्या हस्ते 43 मान्यवरांचा 'पद्म' पुरस्काराने सन्मान
राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.

नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कार वितरण सोहळा आज राजधानी दिल्लीत पार पडला. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातून बंग दाम्पत्याला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. कला, साहित्य, शिक्षा, क्रीडा, संशोधन, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, लोककला, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होती. यंदा 84 जणांना पद्म पुरस्कार घोषित झाले असून त्यातील 43 मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्रातून समाजसेवक डॉ.अभय आणि राणी बंग, साहित्यिक गंगाधर पानतावणे, अरविंद गुप्ता, जेष्ठ अभिनेते मनोज जोशी, उद्योजक रामेश्वरलाल काबरा, मुरलीकांत, शिशिर मिश्रा यांचा पुरस्कार प्रदान केला. डॉ. अभय आणि राणी बंग यांना पद्मश्री, धोनीला पद्मभूषण!
पद्मविभूषण पुरस्कार 2018-
- इलाई राजा (संगीतकार )
- गुलाम मुस्तफा खान (शास्त्रीय गायक)
- परमेश्वरन (ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ )
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























