एक्स्प्लोर
Advertisement
मुस्लीमांना गटारात राहू देण्याचं वक्तव्य करणारे काँग्रेसचे ते मंत्री कोण होते?
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात झालेल्या शहा बानो खटल्यावेळी एका काँग्रेस नेत्याने मुस्लीमांना गटारातच राहू देण्याचं म्हटलं होतं. मात्र हे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याचं नाव मोदींनी सांगितलं नाही.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील चर्चेचं उत्तर देताना काँग्रेसवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींनी मुस्लीमांबद्दल काँग्रेसच्या विचारावर प्रश्न उपस्थित करत म्हटलं की, काँग्रेसला मुसलमानांचा विकास करायचा नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात झालेल्या शहा बानो खटल्यावेळी एका काँग्रेस नेत्याने मुस्लीमांना गटारातच राहू देण्याचं म्हटलं होतं. मात्र हे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याचं नाव मोदींनी सांगितलं नाही.
आपला मुद्दा पटवून देण्यासाठी मोदींनी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात मंत्री असलेल्या एका नेत्याच्या वक्तव्याचा आधार घेतला. "काँग्रेसच्या मंत्र्याने स्वत: म्हटलं होतं की मुस्लीमांच्या विकासाची जबाबदारी काँग्रेसची नाही, जर त्यांना गटारात पडून राहायचं असेल तर राहू दे," असं मोदी सभागृहात सांगितलं. मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात झालेल्या शहा बानो केसवरील एबीपी न्यूजच्या 'प्रधानमंत्री' या कार्यक्रमाच्या एपिसोडचा उल्लेख करत काँग्रेसला भूतकाळातून धडा घेण्याचा सल्ला दिला.
तत्कालीन गृहराज्यमंत्री आरिफ मोहम्मद खान यांच्याकडून नेत्याचा नावाचा खुलासा
पंतप्रधान मोदींच्या केलेल्या विधानानंतर संसदेत काँग्रेस खासदारांनी गोंधळ सुरु केला आणि नेत्याचं नाव विचारु लागले. यावर मी यूट्यूब लिंक पाठवेन, असं उत्तर मोदींनी दिलं. मात्र यानंतर तत्कालीन गृहराज्यमंत्री आरिफ मोहम्मद खान यांनी त्या मंत्र्याच्या नावाचा खुलासा केला, ज्याने मुस्लीमांना गटारात राहू देण्याचं वक्तव्य केलं होतं.
माजी पंतप्रधानमंत्री नरसिंह राव यांचं वक्तव्य
एबीपी न्यूजच्या 'प्रधानमंत्री' या कार्यक्रमात आरिफ मोहम्मद खान यांनी तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर राजीव गांधी सरकारवर गंभीर आरोप केले होते. काल (25 जून) आरिफ मोहम्मद खान यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याला दुजोरा देत म्हटलं की, काँग्रेसच्या एका नेत्याने तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर मुस्लीमांना गटारात राहू देण्याचा उल्लेख माझ्याकडे केला होता. आरिफ मोहम्मद खान म्हणाले की, हे वक्तव्य माजी पंतप्रधान दिवंगत पी व्ही नरसिंह राव यांनी केलं होतं. पी व्ही नरसिंह राव हे राजीव गांधी सरकारमध्ये गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्री होते.
काय आहे प्रकरण?
23 एप्रिल 1985 रोजी तिहेरी तलाक प्रकरणात सुप्रीम कोर्टाने शाह बानो या मुस्लीम महिलेच्या बाजूने निकाल दिला होता. कोर्टाच्या निर्णयानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारला मुस्लीम व्होट बँक आपल्या हातातून निघून जाईल याची भीती होती. राजीव गांधी सरकारने कायद्यात बदल करुन हा निकाल बदलला. यानंतर पंतप्रधानांचे सल्लागार अरुण नेहरु आणि नरसिंह राव हे तत्कालीन गृहराज्य मंत्री आरिफ मोहम्मद खान यांची समजूत काढण्यासाठी गेले होते. आरिफ मोहम्मद खान यांच्या दाव्यानुसार, याचवेळी नरसिंह राव म्हणाले की तुम्ही एवढा हट्ट का करता? आम्ही समाजसुधारक नाही. जर मुस्लीमांना गटारात राहायचं असेल, तर तिथेच राहू दे.
सिंहासन : शाह बानो प्रकरणावरील विशेष भाग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भविष्य
मुंबई
मुंबई
Advertisement