एक्स्प्लोर
पाकिस्तानला निघालेल्या उस्मानाबादच्या 'त्या' तरुणाच्या प्रकरणाला वेगळे वळण
पाकिस्तानला आपल्या कथित प्रेयसीला भेटायला निघालेल्या उस्मानाबादच्या तरुणाच्या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. झिशान सिद्दिकीला आता गुजरात पोलिसांनी अटक केली आहे.
उस्मानाबाद : पाकिस्तानला आपल्या कथित प्रेयसीला भेटायला निघालेल्या उस्मानाबादच्या तरुणाच्या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. झिशान सिद्दिकीला आता गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात कलम 3 आणि भादंवि 188 प्रमाणे गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे. आता गुजरात पोलिस झिशान खरंच मुलीच्या प्रेमात पडला होता का? की त्याचा आणखी काही हेतू होता? याचा तपास करणार आहेत. दरम्यान झिशानला घेण्यासाठी गेलेल्या उस्मानाबाद पोलिसांना झिशानचा ताबा दिलेला नाही. न्यायालयाने जामीन दिल्यानंतरच झिशानला उस्मानाबाद पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती आहे.
'असं' घरी सांगून 'तो' प्रेयसीला भेटायला निघालेला पाकिस्तानात!
सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाक सीमेवरुन एका 20 वर्षीच्या झिशानला 17 जुलै रोजी पकडले आहे. तो प्रेयसीला भेटण्यास पाकिस्तानला निघाला होता, अशी माहिती आहे. यासंदर्भात झिशानच्या वडिलांशी एबीपी माझाने संवाद साधला. ते म्हणाले की, झिशान 11 तारखेला दहा वाजता घरातून बाहेर पडला. मोबाईलचा चार्जर आणायचा आहे, म्हणून तो घराबाहेर पडला. एक तास होऊनही तो घरी आला नाही त्यावेळी त्याला फोन केला. तर त्याचा फोन बंद आला, असं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, आम्ही वाट पाहिली पण तो घरी आला नाही. तीन महीने झालं लॉकडाऊनमध्ये तो कधीच बाहेर पडला नाही. आम्ही त्याला बाहेर जा म्हटलं तर तो म्हणायचा, बाहेर लॉकडाऊन आहे, बाहेर काय पोलिसांचा मार खायला जाऊ काय. तो नमाज वगेरे घरातूनच करायचा. मात्र त्या दिवशी तो घराच्या बाहेर पडला. दिवसभर तो घरी न आल्यानं आम्ही सात वाजता पोलिस स्थानकात मिसिंगची तक्रार केली आणि लोकांना मेसेजही केले. आम्ही दुसऱ्या दिवशी रविवारी आसपासच्या परिसरात त्याचा शोध घेतला.सोमवारी आम्हाला माहिती मिळाली की, वाशीमधून कॉल आला की तो, शनिवारी रात्री वाशीत होता. तो इथून रिकाम्या हातीच गेला, असंही ते म्हणाले.
VIDEO | UNCUT | प्रेयसीला भेटण्यास पाकिस्तानला निघालेल्या तरुणाच्या वडिलांची प्रतिक्रिया
भारत-पाक सीमेवरुन उस्मानाबादचा तरुण ताब्यात, प्रेयसीला भेटायला निघालेला पाकिस्तानात
आम्हाला बातमी पाहून कळलं की तो बॉर्डरवर सापडला. तो तेरणा कॉलेजला तिसऱ्या वर्षाला इंजिनियरिंगचं शिक्षण घेत आहे. मुलगा असा जाईल असं आम्हाला कधीच वाटत नव्हतं. गल्लीत कुणालाही असं वाटलं नव्हतं. आता हे समोर आल्यावर सगळेजण आश्चर्याने विचारताहेत की, तो असं करुच शकत नाहीत. तो घरात लॅपटॉपवर अभ्यास करायचा, आम्हाला याबाबत माहिती नसल्यानं तो नेमकं काय करतोय? हे कसं कळणार, असंही झिशानच्या वडिलांनी सांगितलं.
VIDEO | UNCUT | प्रेमासाठी काहीही... पाकिस्तानला निघालेल्या तरुणाला कसं केलं ट्रेस?
17 तारखेला सीमा सुरक्षा दलाने झिशानला रात्री पाकिस्तानी सीमेवर 9.30 वाजता पकडले. विशेष म्हणजे तो आपल्या कथित प्रेयसीला भेटायला दुचाकीवरुन निघाला होता. देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन असताना तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. माहितीनुसार, झिशान हा उस्मानाबादहून अहमदनगरपर्यंत सायकलवर पोहोचला. अहमदनगर ते गुजरात मोटार सायकलवर पोहोचला आणि मग पायी चालत सीमेच्या जवळ पोहोचला. त्याची दुचाकी वाळूमध्ये अडकल्यानंतर तो पायी चालत पाकिस्तानला जाणार होता. सुरक्षा दलाला वाळूत अडकलेली एक दुचाकी सापडल्यानंतर त्यांनी शोध मोहीम सुरू केली. यानंतर त्यांनी झिशानला ताब्यात घेतले. त्यावेळी तो महाराष्ट्रातला असल्याचे स्पष्ट झाले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील कथित प्रेयसीला भेटण्यासाठी सीमारेषा ओलांडून पाकिस्तानकडे जाण्याची झिशानची इच्छा होती. कथित प्रेयसीला भेटायला बीएसएफने पाकिस्तान आणि कच्छ सीमेपलीकडे फिरत असताना पकडले. उस्मानाबाद पोलिसांची एक तुकडी या मुलाला ताब्यात घेण्यासाठी पोहोचली आहे. मुलाच्या दाव्यात किती तथ्य आहे, याचा शोध घेतला जाणार आहे.
या मुलाचे वडील मौलाना आहेत. तो इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. जाताना हा उस्मानाबाद ते अहमदनगर जिल्ह्यातील पर्यंत सायकलवर गेला. तिथून त्याने दुचाकी घेतली. याची माहिती कळाल्यावर एटीएस, सायबर, औरंगाबाद, उस्मानाबाद, मुंबई टीम कार्यान्वीत झाल्या. उस्मानाबाद, औरंगाबाद आणि मुंबई एटीएसने शोध घेतला. त्याचा लॅपटाॅप तपासला गेला. तो पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात आहे, हे लक्षात आल्यावर सीमेवर कळवले होते.
हे ही वाचा-
प्रेमाच्या शोधात पाकिस्तानात गेलेला मुंबईकर हमीद सहा वर्षांनी मायदेशी
हमीद अन्सारी सहा वर्षांनी पाकहून भारतात सुखरुप परत!
सैन्य दलातील त्रासाला कंटाळून चंदू चव्हाणांचा राजीनामा, आर्मी म्हणते चव्हाण दोषी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement