लहान मुलांनाही मिळतेय पेन्शन, EPFO नं सांगितलं कधीपर्यंत मिळणार आर्थिक मदत?
EPFO : कोरोनामुळं देशभरात अनेकजण अनाथ झाले. कुणी आईला गमावलं तर कुण्याच्या डोक्यावरुन वडिलांचं क्षत्र हरवलं. अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. त्यातच अनेकांना आर्थिक चणचणही भासत असेल.
Employees Pension Scheme : दोन वर्षांपासून देशभरात कोरोना महामारीचा प्रादुर्भव सुरु आहे. या महामारीमध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. इतकेच नाही तर अनेक लहान मुलं अनाथ (Orphans) झाली. कुणाचे वडील गेले तर कुणाची आई. काही मुलांच्या आई आणि वडिलांचाही मृत्यू झाला. या अनाथ मुलांना एम्प्लॉई पेंशन स्कीम (EPS) अंतर्गत आर्थिक मदत (Financial Support) मिळू शकते. ही मदत त्या मुलांना मिळेल, ज्यांचे आई किंवा वडील नोकरी करत असतील आणि ते ईपीएस सदस्य असतील. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (EPFO) ट्विट करत एपीएस स्कीमद्वारे अनाथ मुलांना मिळणाऱ्या लाभांविषयी (EPS Benefits) माहिती दिली आहे.
Benefits payable to orphans under EPS'95.#EPFO #EPF #SocialSecurity #ईपीएफओ #ईपीएफ@byadavbjp @Rameswar_Teli @PMOIndia @LabourMinistry @PIB_India @PIBHindi @MIB_India @DDNewslive @mygovindia @wootaum pic.twitter.com/Qs6tgZgzEv
— EPFO (@socialepfo) November 15, 2021
ईपीएसअंतर्गत अनाथ मुलांना काय फायदा मिळतोय?
– अनाथ मुलांना मिळणारी पेन्शनची रक्कम मासिक कुटंब पेन्शनच्या 75 टक्के इतकी असेल. ही रक्कम कमीतकमी 750 रुपये प्रति महिना इतकी असेल.
– एका वेळी दोन अनाथ मुलांना प्रत्येकी 750 रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल.
– ईपीएस योजनेअंतर्गत अनाथ मुलांना वयाच्या 25 वर्षांपर्यंत पेन्शन दिली जाईल.
– जर मुलं अपंगत्वाने ग्रस्त असतील तर त्यांना आयुष्यभर पेन्शन दिली जाईल.
ईपीएससाठी काही पैसे भरावे लागतील?
– ईपीएससाठी कंपनी कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून एक रुपयाही कट करत नाही.
– कंपनीच्या रकमेपैकी काही भाग ईपीएसमध्ये जमा होतो.
– नव्या नियमांनुसार 15 हजार रुपयांचा बेसिक पगार असणाऱ्यांना या सुविधेचा लाभ मिळतो.
– नव्या नियमांनुसार पगारातील 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये जमा केली जाते.
– 15,000 रुपये बेसिक पगार झाल्यानंतर कंपनी कर्मचाऱ्याच्या ईपीएसमध्ये 1,250 रुपये जमा करते.
पेन्शनसाठी काय करावं लागेल?
पेन्शन मिळणाऱ्या व्यक्तीला कर्मचारी भविष्य निधी योजना-1995 (EPS-95) अंतर्गत जिवंत असल्यांचं प्रमाणपत्र (Life Certificate) जमा करावं लागते. डिजिटलपद्धतीनेही हे प्रमाणपत्र जमा करु शकता. प्रत्येकवर्षी हे प्रमाणपत्र जमा करावं लागतं. प्रमाणपत्र जमा केल्यानंतर पेन्शन मिळण्यास कोणतीही अडचण होणार नाही. व्हिडीओ कॉलद्वारेही प्रमाणपत्र जमा करण्याची सुविधा सुरु झाली आहे.