एक्स्प्लोर

पाकिस्तानमधील एअर स्ट्राईकचे पुरावे मागून विरोधक जवानांचे खच्चीकरण करत आहेत : नरेंद्र मोदी

भारतीय वायु सेनेने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. विरोधक या कारवाईचे पुरावे मागून आपल्या जवानांचे खच्चीकरण करत असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

पाटना : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायु सेनेने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. विरोधक या कारवाईचे पुरावे मागून आपल्या जवानांचे खच्चीकरण करत असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. बिहारच्या पाटणा येथे आज एनडीएकडून संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, या रॅलीदरम्यान एका भाषणात मोदी बोलत होते. मोदी म्हणाले की, "भारतीय वायु सेनेने पाकिस्तानव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये घुसून 'जैश ए मोहम्मद'च्या अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. सरकारने जवानांचे मनोबल वाढवले. सध्या दहशतवादाविरोधात आपण आपली एकजूट दाखवण्याची गरज आहे. त्याच वेळी दिल्लीत 21 पक्ष एनडीएविरोधात ठराव मांडत आहेत. परंतु नागरिक या विरोधकांना माफ करणार नाहीत. भारत आता त्यांच्या वीरांच्या बलिदानानंतर पूर्वीसारखा गप्प बसत नाही उलट चुन चुन के बदला लेता है" दरम्यान काही वेळापूर्वी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी वायुसेनेने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे जगासमोर ठेवण्याची मागणी मांडली आहे. दिग्विजय सिंह यांनी म्हटले की, "काही वर्षांपूर्वी अमेरिकेने पाकिस्तानमध्ये घुसून अमेरिकेचा नंबर एकचा शत्रू असलेल्या ओसामा बिन लादेनवर कारवाई केली. त्याचा अड्डा उध्वस्त करुन त्याला ठार केले. कारवाई पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेने लादेनला ठार केल्याचे पुरावे जगासमोर ठेवले होते. त्याचप्रमाणे आपणही दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबाबत करायला हवे." काँग्रेसकडून सातत्याने मोदींवर टीका केली जात आहे. राहुल गांधी प्रत्येक सभेत 'चौकीदार ही चोर है' अशी घोषणा देतात. यावर मोदी यांनी आज उत्तर दिले मोदी म्हणाले की, "चौकीदार चोर नही चौकन्ना है, आणि देशाला लुटणारे या चौकीदारामुळे हैराण आहेत."
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंचा पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री

व्हिडीओ

Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
K Annamalai: तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
तमिळनाडूत भाजपला बस्तान बसण्यापूर्वीच भगदाड, माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईं पक्षाला रामराम, कारवरचा झेंडा सुद्धा काढून टाकला
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण आंदोलन; मृत आंदोलकांच्या वारसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
Embed widget