एक्स्प्लोर
राहुल गांधींसह विरोधकांच्या शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळावर रोखलं
राहुल गांधी यांच्याशिवाय विरोधकांच्या शिष्टमंडळात काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, केसी वेणुगोपाल, सीपीएम नेते सीताराम येचुरी, जेडीयू नेते शरद यादव, द्रमुक नेते तिरुची शिवा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन, सीपीआय नेते डी राजा, तृणमूल काँग्रेसचे नेते दिनेश त्रिवेदी, राजदचे मनोज झा यांचा समावेश आहे.
श्रीनगर : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर निघालेल्या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आलं आहे. त्यांना काश्मीरला जाऊ दिलं जाणार नाही, विमानतळावरुनच परत पाठवण्यात येईल, असं समजतं. जम्मू काश्मीरसाठीचं कलम 370 हटवल्यानंतर विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेणार असून तिथल्या नागरिकांचीही भेट घेणार आहेत.
याआधीच जम्मू काश्मीर प्रशासनाने राहुल गांधींसह इतर नेत्यांना राज्याचा दौरा न करण्याचं आवाहन केलं होतं. "नेत्यांच्या दौऱ्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नेत्यांनी इथे येणं टाळावं. आतापर्यंत कोणत्याही नेत्याला राज्यात प्रवेश करु दिलेला नाही," असं जम्मू काश्मीर प्रशासनाने म्हटलं होतं.
अनेक पक्षांचे नेते शिष्टमंडळात
राहुल गांधी यांच्याशिवाय विरोधकांच्या शिष्टमंडळात काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, केसी वेणुगोपाल, सीपीएम नेते सीताराम येचुरी, जेडीयू नेते शरद यादव, द्रमुक नेते तिरुची शिवा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन, सीपीआय नेते डी राजा, तृणमूल काँग्रेसचे नेते दिनेश त्रिवेदी, राजदचे मनोज झा यांचा समावेश आहे.
परवानगी मिळाल्यास इतर भागात जाऊ शकतात
शिष्टमंडळाला परवानगी मिळाली तरच ते राज्याच्या इतर भागातही जाऊ शकतात. कलम 370 हटल्यानंतर राज्यात कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला जाण्याची परवानगी दिलेली नाही. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती नजरकैदेतच ठेवलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
Advertisement