स्काल्प अन् ब्रह्मोस स्मार्ट मिसाईलचा अचूक मारा, आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकड्यांना धडा शिकवला; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत नि. मेजर जनरल नेमकं काय म्हणाले?
भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून 'ऑपरेशन सिंदूर' ही मोहीम फत्ते केलीय. या बाबत महत्वपूर्ण माहिती निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी दिली आहे.

Operation Sindoor :अखेर भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली आहे. ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) हे पहाटे 1:28 वाजता ' सुरू होऊन 1:51 वाजता ते यशस्वीरित्या पूर्ण झालं. तिन्ही सैन्यदल यामध्ये सहभागी झाले होते. यात एकाच वेळी नऊ ठिकाणी हल्ला करण्यात आलाय. भारतीय सैन्यदलाचे हे मोठे यश आहे. यात स्काल्प आणि ब्रह्मोस हे स्मार्ट मिसाईल आहेत, यांची क्षमता खूप जास्त आहे. यांचा रडार डिटेक्शन होत नाही. स्काल्प मिसाईलची रेंज 500 किमी आहे आणि 1000 किलोमीटर पेक्षा जास्त गतीने ही मिसाईल प्रवास करते. तर ब्रह्मोस क्रूज मिसाइल असून ती कमी उंचीवर विशिष्ट गतीने प्रवास करताना कुठलेही संकेत शत्रूसाठी सोडत नाही. त्यामुळे ब्रह्मोस रडार डिटेक्शन खूप कठीण होते. ब्रह्मोस टीएनटी (स्फोटक) मोठ्या प्रमाणावर घेऊन जाते, त्यामुळे खूप मोठा नुकसान पोहोचवत असल्याची महत्वपूर्ण माहिती निवृत्त मेजर जनरल अनिल बाम (Retired Major General Anil Bam) यांनी दिली आहे.
दरम्यान, पाकिस्तान काहीच नुकसान न झाल्याचा कांगावा करेल, मात्र जे शस्त्र भारताने वापरले आहे, ते मोठा विध्वंस करणारे आहे. ज्या मशिदी भारताने उडवल्या आहे, त्या मशीदी दहशतवादी संघटनांचा मुख्यालय म्हणून आश्रयस्थान म्हणून वापरले जात होत्या. आणि अशा टार्गेट्स चे अचूक कोऑर्डिनेट्स स्काल्प किंवा ब्रह्मोस मिसाईलमध्ये सेट केले तर ते टारगेटला पूर्णपणे नष्ट करणारच, असेही निवृत्त मेजर जनरल अनिल बाम म्हणाले.
भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडूनही धडा शिकवला- अनिल बाम
पाकिस्तानला वाटत होते आज भारतात मॉक ड्रिल आहे, त्यामुळे काही दिवसानंतर हल्ला होईल असे त्यांना वाटत होते. मात्र, भारतासाठी हीच अचूक वेळ होती आणि त्याचा अचूक वापर करण्यात आला आहे. ज्या नऊ ठिकाणांवर हल्ले करण्यात आले त्यापैकी काही पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील आहे, बहुतांशी ठिकाण पाकिस्तान मधील पंजाब प्रांतातील आहे. त्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडूनही धडा शिकवला आहे. सर्व ठिकाण भारत पाकिस्तान सीमेवर उत्तर ते दक्षिण विखुरलेले आहे. आता पाकिस्तान जो काही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल त्यावरूनच पुढे हे संघर्ष किती वाढेल हे अवलंबित राहील.भारताने फक्त दहशतवादी तळ उध्वस्त केले आहे, पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केलेला नाही. मात्र पाकिस्तानने जास्त धाडस केलं, तर आपण पाकिस्तानी सैन्यालाही नेस्तनाबूत करू शकतो. असा विश्वास ही निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी व्यक्त केला आहे.
सर्वाधिक दहशतवाद्यांची उपस्थिती असलेले तळ केले बेचिराख-
बहावलपूरमध्ये 250 हून अधिक दहशतवादी
मुरिदकेमध्ये 120 हून अधिक दहशतवादी
मुजफ्फराबादमध्ये 110 ते 130 दहशतवादी
कोटलीमध्ये 75 ते 80 दहशतवादी
सियालकोटमध्ये 90 ते 100 दहशतवादी
गुलपूरमध्ये 75 ते 80 दहशतवादी
भिंबरमध्ये 60 हून अधिक दहशतवादी
चाक अम्रूमध्ये 70 ते 80 दहशतवादी
हे ही वाचा























