Operation sindoor BrahMos Missile : ब्राह्मोसचा जहरी वार, पाकिस्तान गार, पाकचे रडार हल्ले का रोखू शकले नाहीत, ऑपरेशन सिंदूरसाठी ब्राह्मोसचीच निवड का केली?
Operation sindoor BrahMos Missile : भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी ब्राह्मोस क्षेपणास्त्र का निवडले? याबाबत जाणून घेऊयात...

Operation sindoor BrahMos Missile : भारताने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) "ऑपरेशन सिंदूर" (Operation Sindoor) सुरू केले. ज्यामध्ये पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवादी आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा (BrahMos Missile) वापर करण्यात आला. सुमारे 15 क्षेपणास्त्रे डागण्यात आली. भारताने (India) ब्राह्मोस का निवडले आणि या ऑपरेशनमध्ये ब्राह्मोस भूमिका काय होती? याबाबत जाणून घेऊयात...
ब्राह्मोस ही एक सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे, जी ध्वनीच्या वेगाच्या तीन पट वेगाने (मॅक 3) उडते. हे भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून, समुद्रातून आणि आकाशातून प्रक्षेपित करता येते. याची श्रेणी 290 ते 450 किलोमीटर दरम्यान आहे. यात 200 ते 300 किलोग्रॅमपर्यंत स्फोटके असतात, ज्यामुळे ती मोठ्या लष्करी ठिकाणांचा विनाश करण्यास सक्षम ठरते.
ब्राह्मोस का निवडले गेले?
वेगवान आणि रडारपासून दूर: ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा प्रचंड वेग याला शत्रूच्या रडारपासून लपण्यास मदत करतो, त्यामुळे पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ मिळाला नाही.
अचूक हल्ले: हे क्षेपणास्त्र अचूक लक्ष्य भेदते, त्यामुळे भारताने दहशतवादी तळांचा सामान्य नागरिकांना इजा न करता नाश केला.
रणनीतिक लवचिकता: हे विविध प्लॅटफॉर्म्सवरून डागता येते, जसे की सुखोई-30 विमान, जे ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरण्यात आले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्राह्मोसची भूमिका
ऑपरेशन सिंदूर 7 मे ते 10 मे २०२५ दरम्यान पार पडले, ज्यामध्ये दोन टप्पे होते. पहिला टप्पा 7 मे रोजी आणि दुसरा टप्पा 10 मे रोजी झाला. दुसऱ्या टप्प्यात भारताने सुमारे 15 ब्राह्मोस क्षेपणास्त्रे डागली, ज्यांनी पाकिस्तानचे 11 एअरबेस – जसे की राफिकी, मुरीद, नूर खान आणि चुनिया हे नष्ट केले. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानची हवाई सुरक्षा व्यवस्था आणि कमांड कंट्रोल सिस्टिम पूर्णपणे कोलमडून गेली होती.
भारताने बनावट (डमी) लढाऊ विमाने पाठवून पाकिस्तानला गोंधळात टाकले आणि त्यानंतर ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा मारा केला, ज्यामुळे पाकिस्तानची संरक्षण प्रणाली फसली. याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी “आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ताकद पाहिली असेलच, आणि जर पाहिली नसेल तर पाकिस्तानला विचारून बघा,” असे त्यांनी म्हटले आहे.
ब्राह्मोस क्षेपणास्त्र: तांत्रिक माहिती
ब्राह्मोस ही एक सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे, ज्याचा वेग सुमारे 2,800 ते 3,000 किलोमीटर प्रति तास आहे. हे भारत आणि रशिया यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राचे नाव भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मोस्कवा नदी यांच्या नावांवरून ठेवले गेले आहे.
ब्राह्मोसची मुख्य वैशिष्ट्ये
- ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र जमिनीवरून, समुद्रातून (जहाज आणि पाणबुडी) तसेच हवेतून (जसे की सुखोई-30 MKI विमानातून) प्रक्षेपित करता येते.
- प्रगत नेव्हिगेशन आणि मार्गदर्शन प्रणालीमुळे हे क्षेपणास्त्र अत्यंत अचूकतेने लक्ष्यावर आदळते.
- ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र दिवस-रात्र आणि कोणत्याही हवामानात कार्य करू शकते.
- ब्राह्मोस एकदा डागल्यानंतर या क्षेपणास्त्रासाठी ऑपरेटरच्या सतत देखरेखीची गरज भासत नाही.
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम
ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेला गंभीर नुकसान पोहोचवले, विशेषतः त्यांच्या हवाई संरक्षण व्यवस्था आणि कमांड कंट्रोल सिस्टिमला. 15 ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी 11 एअरबेस नष्ट केले, ज्यामुळे पाकिस्तानला अमेरिकेकडून युद्धविरामासाठी विनंती करावी लागली. याशिवाय, या ऑपरेशनमुळे भारताच्या संरक्षण तंत्रज्ञानाची ताकद संपूर्ण जगासमोर आली, ज्यामुळे अनेक देशांनी ब्राह्मोस क्षेपणास्त्रात रस दाखवला आहे.
आणखी वाचा























