एक्स्प्लोर

Onam 2021 : केरळमध्ये साजरा करण्यात येणारा 'ओनम' काय आहे? काय आहे या उत्सवाची खासियत

Happy Onam 2021 : केरळच्या संस्कृतीमध्ये ओनमचे महत्व सर्वाधिक मोठं आहे. बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर परत येतो अशी एक आख्यायिका सांगितली जाते. 

Onam 2021 : केरळवासियांसाठी महत्वाचा सण म्हणजे ओनम. हा सण जगभरातील मल्याळम बांधवांकडून धुमधडाक्यात साजरा केला जातो. ओनम म्हणजे केरळच्या नवीन वर्षाची सुरुवात. बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर परत येतो अशी एक अख्यायिका सांगितली जाते. बळीराजाच्या आगमनानिमित्त आज त्याच्या स्वागतासाठी ओनमचा सण साजरा करण्यात येतो. 

दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवातील महत्वाचा दिवस म्हणजे ओनम. शेतकऱ्यांच्या घरी धन-धान्यांची आरास येऊ दे यासाठीही आजच्या दिवशी पूजा करण्यात येते. या वर्षी हा सण 23 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

बळीराजा आपल्या प्रजेच्या भेटीला
बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी या दिवशी पृथ्वीवर परत येतो अशी एक अख्यायिका सांगितली जाते. बळीराजा आपल्या न्यायीपणाबद्दल, पराक्रमाबद्दल आणि प्रजेवरील प्रेमाबद्दल प्रसिद्ध होता. त्यामुळे त्याच्या आगमनाचा उत्सव हा ओनमच्या स्वरुपात साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी सर्व लोक नवनवीन कपडे परिधान करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी लोक पहाटे स्नान करुन देवदर्शन करतात. पुक्काळम् (फुलांची रांगोळी) हेही एक आकर्षण. प्रत्येक घरासमोरील अंगण शेणाने सारवले जाते आणि भलीमोठी रांगोळी काढली जाते. ओनमच्या निमित्ताने पारंपरिक खाद्यपदार्थ आणि गोड मेजवानीचाही बेत आखतात. पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषत: केरळचे पारंपरिक नृत्य कथकली आणि पुलीकलीचे आयोजन केलं जातं. 

बळीराजाला वरदान
विष्णूने वामन अवतार धारण करुन बळीराजाला पाताळात ढकलले. बळीराजाने वचनपूर्तीसाठी आपले प्राणही दिले. बळीराजाच्या या त्यागावर खुश होऊन विष्णूने त्याला वरदान मागण्यास सांगितले. त्यावर बळीराजाने वर्षातून एकदा आपल्या प्रजेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ओनमच्या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटायला येतो असं समजलं जातं. 

ओनम हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या काळात पीक कापणीचा हंगाम सुरु असतो. पावसाळा संपत आल्याने निसर्गात सगळीकडे हिरवाईचा बहर असतो. 

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजीDhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजचABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
मंत्रालयातील लॅम्बोर्गिनी प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, VIP कारच्या मालकाचं नाव सांगितलं, म्हणाले....
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Nashik Accident: नाशिकच्या भीषण अपघातात पुण्याच्या आयटी कंपनीतील एकटा विक्रांत कसा वाचला? आक्रित घडण्यापूर्वी मृत्यू समोर दिसला
नाशिकच्या भीषण अपघातापूर्वी विक्रांतला मृत्यू समोर दिसला, पण मित्रांनी ऐकलं नाही, नेमकं काय घडलं?
Embed widget