एक्स्प्लोर

4 october In History : यूएनमध्ये वाजपेयींचे हिंदीतून भाषण अन् गोपनीय माहिती फोडणाऱ्या विकिलीक्सची स्थापना, आज इतिहासात

On This Day In History : जनता पक्षामध्ये परराष्ट्र मंत्री असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांनी 4 ऑक्टोबर 1977 रोजी संयुक्त राष्ट्रांत हिंदीतून भाषण केलं होतं. 

मुंबई: भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. 1977 साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी 3 ऑक्टोबर 1977 रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अटक केली होती. 16 तासांच्या अटकेनंतर, म्हणजे 4 ऑक्टोबर 1977 रोजी सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची सुटका केली. जगभरातील गोपनीय अहवाल उघड करुन खळबळ माजवणाऱ्या विकिलीक्सची स्थापना आजच्याच दिवशी, 2006 साली झाली होती.

जाणून घेऊया आजचा दिवस इतिहासात कोणत्या महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे, 

1535- इंग्रजी भाषेतील पहिले बायबलची छपाई 

इंग्रजी भाषेतील पहिल्या संपूर्ण बायबलची छपाई आजच्याच दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबर 1535 रोजी पूर्ण झाली.  माईल्स कोवरडेल याने ही छपाई केली होती. 

1857- क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांचा जन्म 

भारतीय क्रांतिकारक, वकील आणि पत्रकार श्यामजी कृष्ण वर्मा यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1857 रोजी झाला. त्यांनी इंडियन होम रूल सोसायटी आणि इंडिया हाऊसची स्थापना केली. लंडनमध्ये त्यांनी इंडियन सोशॅलॉजिस्ट या नियतकालिकेची स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांच्या भारतीय धोरणांवर टीका केली. यामुळे त्यांना लंडन सोडावं लागलं आणि नंतर ते पॅरिसला गेले. 

1957- सोव्हिएत रशियाचा पहिला उपग्रह स्पुतनिक अवकाशात झेपावला 

4 ऑक्टोबर 1957 हा दिवस विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासाच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. आजच्याच दिवशी सोव्हिएत रशियाने स्पुटनिक 1 (Sputnik 1) हा उपग्रह यशस्वीपणे अंतराळात पाठवला. अशा प्रकारची कामगिरी करणारा सोव्हिएत रशिया हा जगातील पहिलाच देश ठरला. रशियाच्या या कामगिरीनंतर अमेरिका आणि रशियाचे शीतयुद्ध अवकाशातही सुरू झालं.  31 जानेवारी 1958 रोजी अमेरिकेने आपला पहिला उपग्रह अवकाशात पाठवला. भारताने 19 एप्रिल 1975 रोजी आर्यभट हा उपग्रह अवकाशात पाठवला.  

1977- अटल बिहारी वाजपेयी यांचे संयुक्त राष्ट्राला हिंदीतून संबोधन 

जनता पक्षाचं सरकार सत्तेत आल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) हे त्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री बनले. 4 ऑक्टोबर 1977 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्राला हिंदीतून संबोधन केलं. असं करणारे ते पहिलेच भारतीय व्यक्ती होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या या भाषणानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या जगभरातील नेत्यांनी टाळ्यांचा कडकडाटीत त्यांचे कौतुक केलं होतं. 

2006- विकिलीक्सची स्थापना 

जगभरातील देशांची आणि नेत्यांची गोपनीय माहिती उघड करणाऱ्या आणि खळबळ उडवून देणाऱ्या विकिलिक्सची (WikiLeaks) स्थापना 4 ऑक्टोबर 2006 रोजी करण्यात आली. सनशाईन प्रेस या संस्थेच्या माध्यमातून ज्युलियस असांजे (Julian Assange) याने विकिलिक्सची स्थापना केली. 

विकिलीक्स ही जगभरातील गोपनीय तसेच गुप्त बातम्या प्रसिद्ध करणारी एक वादग्रस्त विना-नफा संस्था आहे. विकीलीक्सने आपल्या संकेतस्थळाच्या द्वारे आजवर लाखो गुप्त आणि संवेदनशील सरकारी कागदपत्रे, अहवाल तसेच मेमो प्रकाशित केले आहेत. पहिल्या दहा वर्षामध्ये म्हणजे 2015 पर्यंत विकिलीक्सने एक कोटी डॉक्युमेंट्स प्रकाशित केल्याचा दावा केला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget