एक्स्प्लोर

2nd December In History: नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट, कुख्यात ड्रग किंग पाबोला एस्कोबारचे निधन, आज इतिहासात

On This Day In History : इतिहासात आजच्या दिवशी सात शहरांच्या एकत्रिकरणातून यूएई या देशाची निर्मिती झाली.

मुंबई: ब्रिटनचा राजा जॉर्ज पाचवा आणि क्विन मेरी यांच्या भारत भेटीचे स्मारक असलेल्या मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाची निर्मिती 2 डिसेंबर 1911 रोजी करण्यात आली होती. तसेच आजच्या दिवसी इतिहासात यूएई या देशाची निर्मिती झाली. यासह अनेक महत्त्वाच्या घटनांचा  साक्षीदार 2 डिसेंबर हा दिवस आहे. जाणून घेऊया त्याबद्दल अधिक माहिती, 

1804- नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट बनला

जन्माने फ्रेंच नसला तरी नेपोलियन (Napoleon Bonaparte) हा आपल्या महान कर्तृत्वाच्या जोरावर फ्रेंच सम्राट झाला. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात फ्रेंच सैन्यामध्ये अधिकारी म्हणून केली. त्याच्या इटली, ऑस्ट्रियामधील मोहिमांमुळे तो लवकरच सैन्यात मोठा अधिकारी बनला. फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंत त्याने सरसेनापतीपद हस्तगत केले. नेपोलियनने 18व्या शतकाच्या शेवटीपर्यंत फ्रान्सवर आक्रमण करणाऱ्या अनेक देशांना परास्त केले. आजच्याच दिवसी म्हणजे 2 डिसेंबर 1804 रोजी नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट बनला. 

1911- मुंबईत गेट वे ऑफ इंडियाची निर्मिती 

गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India) ही ब्रिटिशकालीन भारतातील एक भव्य इमारत आहे. 1911 साली  ब्रिटनचा राजा पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. त्याची निर्मिती 2 डिसेंबर 1911 साली करण्यात आली. बेसॉल्ट दगडांनी बांधलेली ही कमान 26 मीटर (85 फूट) उंचीची आहे.

1937- मनोहर जोशी यांचा जन्मदिन 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी झाला. मुंबईतील नगरसेवक ते मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांची वाटचाल उल्लेखनीय आहे. 1995 साली राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर ते मुख्यमंत्री बनले. तसेच लोकसभेचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. 

1942- एन्रिको फर्मी याने चेन रिअॅक्शन नियंत्रित केली 

एन्रिको फर्मी (Enrico Fermi) या इटालियन-अमेरिकन भौतिकीशास्त्रज्ञाने आजच्याच दिवशी शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची श्रृंखला अभिक्रिया म्हणजे चेन रिअॅक्शन नियंत्रित करण्यात यश प्राप्त केलं. त्याच्या या शोधामुळे अणुउर्जेचा शोध लागला. एन्रिको फर्मी याला 1938 सालच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं.

1959- बोमन इराणी यांचा जन्म 

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांचा जन्म 2 डिसेंबर 1959 रोजी मुंबईमधील एका पारशी कुटुंबात झाला. पदवी घेतल्यानंतर बोमन इराणीने हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं. 

यानंतर तो आपल्या आईबरोबर दक्षिण मुंबईतील नोव्हेल्टी सिनेमा आणि अप्सरा सिनेमा यांच्यामध्ये असलेली वाडवडिलार्जित बेकरी चालवू लागला. त्याचबरोबर त्याने दादरमध्ये अंकल चिप्सचे एक दुकानही काढले. पण धंद्यात नुकसान झाल्याने 1986 च्या सुमारास ते बंद केले.नंतर तो व्यावसायिक छायाचित्रकार बनला. 

1971- संयुक्त अरब अमिरातीला ब्रिटनपासून स्वातंत्र्य 

संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates- UAE) हा पश्चिम आशियातील एक अरब देश असून 1971 साली त्याने ब्रिटनपासून आपलं स्वातंत्र्य घोषित केलं. संयुक्त अरब अमिरातीची निर्मिती सात अमिराती एकत्र येऊन झाली आहे. अबू धाबी, दुबई, शारजाह, अजमान, उम-अल-कुवैन, रस-अल-खैमा आणि फुजैरा या सात अमिरातीपासून संयुक्त अरब अमिरातीची निर्मिती झाली. 

1976- फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष 

क्युबाचा महान क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रोने (Fidel Castro) आजच्याच दिवशी, 2 डिसेंबर 1976 रोजी क्युबाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. क्युबामध्ये साम्यवादी विचारसरणीने क्रांती केल्यानंतर तो 1959 ते 1976 या काळात त्या देशाचा पंतप्रधान होता. त्यानंतर 1976 ते 2008 सालापर्यंत त्याने अध्यक्षपद सांभाळलं. साम्यवादी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीच्या आधारे फिडेल कॅस्ट्रो याने क्युबात क्रांती केली. त्याने स्थापन केलेल्या  ‘26 जुलै मूव्हमेंट’ या संघटनेला तरुणांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला आणि क्युबात त्याच्या नेतृत्वाखाली नव्या साम्यवादी विचारसरणीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर त्यानं तब्बल 47 वर्षे त्याने क्युबावर निर्विवादीत वर्चस्व गाजवले. त्याच्या काळात साम्यवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेने अनेक पाऊले उचलली. 

अमेरिकेने जवळपास 45 वर्षांहून जास्त काळ क्युबावर आर्थिक निर्बंध लादले. तरीही फिडेल कॅस्ट्रो डगमगला नाही. अमेरिकेची गुप्तहेर संघटना असलेल्या सीआयएने फिडेल कॅस्ट्रोला अनेकदा ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातंय. पण कॅस्ट्रो या सर्वांना पुरून उरला. 

1988- बेनिझिर भुट्टो पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान 

आजच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 1988 रोजी बेनिझिर भुट्टो (Benazir Bhutto) यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. बेनिझिर भुट्टो या पाकिस्तानच्या 1988 ते 1990 आणि 1993 ते 1996 या दरम्यान दोन वेळा पंतप्रधान राहिल्या होत्या. 27 डिसेंबर 2007 रोजी, रावळपिंडीत एका रॅलीमध्ये असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये भुट्टो यांचा मृत्यू झाला.

1989- भारताचे सातवे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांचा शपथविधी 

विश्वनाथ प्रताप सिंह (Vishwanath Pratap Singh) यांनी 2 डिसेंबर 1989 रोजी भारताचे सातवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. व्हीपी सिंह यांनी 2 डिसेंबर 1989 ते 10  नोव्हेंबर 1990  या काळात, एक वर्षापेक्षा थोडा कमी काळ पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. सिंह यांनी श्रीलंकेतील भारतीय सैन्याच्या अयशस्वी ऑपरेशनला संपविण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याच कारकिर्दीत काश्मिरी अतिरेक्यांनी तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीचे अपहरण केले. त्यांच्या सरकारने बदल्यात अतिरेक्यांना मुक्त करण्याची मागणी मान्य केली. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

पंतप्रधान व्ही पी सिंह यांनी देशात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार देशात ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू करण्यात आलं.

1993- ड्रग किंग पाबोला एस्कोबार याचे निधन 

कोलंबियाचा कुख्यात ड्रग किंग अशी ओळख असलेल्या पाबोला एस्कोबार (Pablo Escobar) याचे आजच्या दिवशी, 2 डिसेंबर 1993 रोजी निधन झालं. कोलंबियातील मेडेलिन कार्टेल या गँगची निर्मिती त्याने केली. जगभरात ड्रगचे जाळे विणण्यात तो यशस्वी झाला. कोकेनच्या व्यापारात त्याचं वर्चस्व होतं. त्याच्या माध्यमातून पाबोलो एस्कोबार याने तब्बल 25 अब्ज डॉलर्सची संपत्ती कमवल्याचं सांगितलं जातंय. तो त्याच्या आलिशान लाईफस्टाईल आणि दहशतीसाठी प्रसिद्ध होता. it 

1999- फेमा कायदा लोकसभेत मंजूर

परकीय पैशाचे व्यवस्थापन आणि देखभालीसाठी परकीय चलन विनिमय कायदा म्हणजे फेमा, foreign exchange management act(FEMA) हा कायदा करण्यात आला. 2 डिसेंबर 1999 रोजी हा कायदा लोकसभेत पारित करण्यात आला. त्या आधी आपल्या देशात फेरा हा कायदा अस्तित्वात होता. हा कायदा मुख्यतः नियमित आणि उदारमतवादी अर्थव्यवस्था भारतामध्ये आणण्यासाठी करण्यात आला.  

2014- महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे निधन 

राज्याचे आठवे मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले (A. R. Antulay) यांचे 2 डिसेंबर 2014 रोजी निधन झाले. बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे भारतामधील एक राजकारणी, केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री म्हणून काम केलं. डॉ. मनमोहन सिंग सरकारमध्ये 2006 ते 2009 दरम्यान पहिले केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री होते. 2004 साली 14व्या लोकसभेवर निवडून आल्यानंतर 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना रायगड मतदारसंघामधून अनंत गीते यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. 2 डिसेंबर 2014 रोजी अंतुले यांचे मुत्रपिंडाच्या विकाराने मुंबई येथे निधन झाले.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडलेSantosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget