एक्स्प्लोर

1 November In History : आजच्याच दिवशी झाली 'या' सहा राज्यांची स्थापना, दिल्ली केंद्रशासित प्रदेश बनलं

On This Day In History : 1 नोव्हेंबर रोजी देशातील अनेक राज्यांच्या निर्मितीचा इतिहास आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी मध्य प्रदेशची स्थापना झाली. जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि लोकसंख्येच्या बाबतीत सहावे मोठे राज्य आहे. 1 नोव्हेंबर 1966 रोजी भाषेच्या आधारावर हरियाणाची निर्मिती झाली. हा पूर्वी पूर्व पंजाबचा भाग होता.

मुंबई : 1 नोव्हेंबर रोजी देशातील अनेक राज्यांच्या निर्मितीचा इतिहास आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी मध्य प्रदेशची स्थापना झाली. जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि लोकसंख्येच्या बाबतीत सहावे मोठे राज्य आहे. 1 नोव्हेंबर 1966 रोजी भाषेच्या आधारावर हरियाणाची निर्मिती झाली. हा पूर्वी पूर्व पंजाबचा भाग होता. हरियाणा हे ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचे आहे, कारण पानिपतच्या तीन लढाया पानिपतच्या मैदानात झाल्या होत्या. हरियाणातील प्रमुख शहरांमध्ये गुडगाव, फरिदाबाद, अंबाला, हिसार, रोहतक आणि सोनीपत यांचा समावेश आहे. छत्तीसगड हे भारतातील दहावे सर्वात मोठे राज्य आहे. जे मध्य प्रदेशातील काही जिल्हे मिळून 1 नोव्हेंबर 2000 रोजी स्थापन झाले. 1 नोव्हेंबर 1956 रोजी कर्नाटकची स्थापना झाली. 1950 मध्ये भारत प्रजासत्ताक बनला तेव्हा विशिष्ट प्रदेशात बोलल्या जाणार्‍या भाषांच्या आधारे अनेक राज्ये आणि प्रांत निर्माण झाले. त्याच वेळी दक्षिण भारतातील कन्नड भाषिक लोकांसाठी म्हैसूर नावाचे राज्य निर्माण झाले. परंतु अनेक प्रदेशांनी म्हैसूर हे नाव स्वीकारले नाही आणि लोकांनी राज्याचे नाव बदलण्याची मागणी केली. शेवटी 1 नोव्हेंबर 1973 रोजी त्याचे कर्नाटक असे नामकरण करण्यात आले. केरळची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली आणि या दिवशी केरळ पिरवी दिनम दरवर्षी साजरा केला जातो. 1 नोव्हेंबर 1956 च्या राज्य पुनर्रचना कायद्याने हैदराबाद संस्थानाचे विभाजन होऊन तेलगू भाषकांचा आंध्र प्रदेश निर्माण झाला.

1950 : भारतातील पहिले वाफेचे इंजिन तयार करण्यात आले 

भारतातील पहिले वाफेचे इंजिन याच दिवशी चित्तरंजन रेल कारखान्यात तयार करण्यात आले होते. 1950 मध्ये या दिवशी भारतातील पहिले वाफेचे इंजिन चित्तरंजन रेल कारखान्यात तयार करण्यात आले होते. 1971 मध्ये येथे वाफेच्या इंजिनांचे उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात आले आणि त्या जागी डिझेल इंजिन बनवण्यास सुरुवात करण्यात आली.

1956 : दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश बनले.

स्वातंत्र्यानंतर दिल्ली देशाची राजधानी बनली. नंतर 1 नोव्हेंबर 1956 रोजी याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला.

1963 : नीता अंबानी यांचा जन्मदिवस 

नीता अंबानी यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1963 रोजी मुंबईत झाला. नीता अंबानी या सुप्रसिद्ध व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत. 

1973: ऐश्वर्या राय बच्चनचा जन्मदिवस 

ऐश्वर्या राय बच्चनचा आज वाढदिवस आहे. ऐश्वर्या ही भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. 1994 मध्ये मिस इंडिया स्पर्धेची उपविजेती ठरल्यानंतर तिने त्याच वर्षी जागतिक सौंदर्य स्पर्धा जिंकली. ऐश्वर्या रायने हिंदीशिवाय तेलुगू, तामिळ, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

आजच्या दिवशी घडलेल्या इतर महत्वाच्या घटना :

1870: अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.
1940: भारताचे 35वे सरन्यायाधीश रमेश चंद्र लाहोटी यांचा जन्म.
1945: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म.
1974: क्रिकेटपटू वी. वी. एस. लक्ष्मण यांचा जन्म.
1873: बंगाली नाटककार दीनबंधू मित्र यांचे निधन.

 

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi India Aghadi Protest Delhi: गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
गनिमी कावा, काँग्रेसचे खासदारही चक्रावले; 9 तास हाय-व्होल्टेज ड्रामा, 2 तास ताब्यात...दिवसभर चाललेल्या राहुल गांधींच्या आंदोलनात काय काय घडलं?
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
Abhijeet Dipke : राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील अल्टो जप्त, जिकडे गाडी सोडून दिलेली, ती जागा पाहून पोलिसही चक्रावले!
Nagpur Crime News : नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
नऊ वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्याला जमावाकडून बेदम मारहाण; संशयित आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू, नागपूरच्या पारडीत खळबळ
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Maharashtra Live blog updates: दुष्काळाचा शेतीवर आधारित उद्योगधंद्यांना फटका, कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
SIR Protest Maharashtra: महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
महाराष्ट्रात SIR विरोधातील आंदोलन तीव्र होताच पोलिसांचा गुप्तचर विभाग कामाला लागला, 'त्या' गोपनीय अहवालात काय?
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Embed widget