(Source: ECI/ABP News/ABP Majha)
27 October In History : माजी राष्ट्रपती के आर नारायणन यांचा जन्मदिन, पेगॅसस प्रकरणी चौकशीसाठी समिती; आज इतिहासात
On This Day In History : भारतात अनेकांची पेगाससद्वारे हेरगिरी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 27 ऑक्टोबर 2021 रोजी समिती तयार करण्यात आली.
मुंबई: देशाचे दहावे आणि दलित समाजाचे पहिले राष्ट्रपती के आर नारायणन (K. R. Narayanan) यांचा आज जन्मदिन. कोचेरिल रमण नारायणन असं त्यांचं पूर्ण नाव असून त्यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1920 रोजी त्रावणकोर या ठिकाणी झाला. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जीवावर संघर्ष करत, कठिण परिस्थितीला सामोरं जात शिक्षण घेतलं. त्याच जोरावर ते देशातील सर्वोच्च स्थानी म्हणजे राष्ट्रपदीपदावर विराजमान झाले. के आर नारायणन हे 1997 ते 2002 या काळात भारताचे राष्ट्रपती होते.
जगाच्या आणि देशाच्या इतिहासात 27 ऑक्टोबर रोजी घडलेल्या इतर महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे,
1795- अमेरिका आणि स्पेनमध्ये करार, मिसिसिपी नदीमध्ये वाहतुकीला परवानगी
इतिहासात आजच्या दिवशी, 27 ऑक्टोबर 1795 रोजी अमेरिका आणि स्पेनमध्ये पिंकनी करार झाला. या करारामुळे अमेरिकेला मिसिसिपी नदीतून व्यापर करण्यासाठी परवानगी मिळाली.
1811- शिलाई मशिनचा शोध लावणाऱ्या आयझॅक मेरिट सिंगरचा जन्म
आपल्या दैनदिन जीवनात उपयोगाच्या असलेल्या शिलाई मशिनचा शोध आयझॅक मेरिट सिंगर याने लावला. या शोधामुळे कपडे शिवण्याचं काम हलकं आणि जलदगतीने होऊ लागलं. त्या आयझॅक मेरिट सिंगरचा जन्म 27 ऑक्टोबर 1811 रोजी झाला.
1920- देशाचे दहावे राष्ट्रपती आर के नारायणन यांचा जन्मदिन
देशाचे दहावे आणि दलित समाजाचे पहिले राष्ट्रपती के आर नारायणन यांचा आज जन्मदिन. कोचेरिल रमण नारायणन असं त्यांचं पूर्ण नाव असून त्यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1920 रोजी त्रावणकोर या ठिकाणी झाला. त्यांनी आपल्या मेहनतीच्या जीवावर संघर्ष करत, कठिण परिस्थितीला सामोरं जात शिक्षण घेतलं. त्याच जोरावर ते देशातील सर्वोच्च स्थानी म्हणजे राष्ट्रपदीपदावर विराजमान झाले. के आर नारायणन हे 1997 ते 2002 या काळात भारताचे राष्ट्रपती होते.
1978- इजिप्तच्या अन्वर सादात आणि इस्त्रायलच्या मेनाखेम बेगिन यांना शांततेच्या नोबेलने सन्मानित
इजिप्तचे राष्ट्रपती मोहम्मद अन्वर सादत यांनी 1970 साली इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यांनी इस्त्रायलसोबतचा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले. इस्त्रायलसोबत शांततेचा करार करणारा इजिप्त हा पहिलाच अरब देश होता. मोहम्मद अन्वर सादत यांनी हा करार केला होता. त्यांच्या या कृत्यामुळे अरब देशांमध्ये असंतोष पसरला होता तर जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. कट्ट्ररवाद्यांना त्यांचा हा निर्णय पटला नाही. यातूनच त्यांची हत्या करण्यात आली.
मोहम्मद अन्वर सादत यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत अलिप्ततावादी भूमिका घेतली होती. इस्त्रायलसोबत केलेल्या शांती करारानंतर त्यांना आणि इस्त्रायलच्या मेनाखेम बेगिन यांना 27 ऑक्टोबर 1978 रोजी शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
1995- युक्रेनच्या किव्हमधील चेर्नोबिल अणूभट्टी केंद्र बंद
सोव्हिएत रशियाच्या पाडावानंतर चेर्नोबिल ही अणूभट्टी युक्रेनमध्ये आली. पण सुरक्षेच्या कारणास्तर 27 ऑक्टोबर 1995 रोजी ही अणूभट्टी बंद करण्याचा निर्णय युक्रेन सरकारने घेतला.
2021- पेगॅसस प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती तयार
इस्त्रायलच्या पेगॅसस या तंत्रज्ञानाचा वापर करुन राजकारणी, पत्रकार आणि महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवल्याचा आरोप झाल्यानंतर न्यायालयाने यासंबंधी तपास करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची समिती तयार करण्यासाठी निर्देश दिले होते. 27 ऑक्टोबर 2021 रोजी ही समिती निर्माण करण्यात आली.
भारतातही अनेकांची पेगाससद्वारे हेरगिरी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर, दोन केंद्रीय मंत्री, माजी निवडणूक आयुक्त, सुप्रीम कोर्टाचे दोन रजिस्ट्रार, निवृत्त न्यायाधीश, माजी अॅटर्नी जनरल यांचे निकटवर्तीय, काही सामाजिक कार्यकर्ते आणि 40 पत्रकारांवर पेगाससद्वारे पाळत ठेवली गेली असल्याचे एका वृत्तात म्हटले होते.
2021- अग्नी 5 चे यशस्वी परीक्षण
भारताने 27 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरखंडीय क्षेपनास्त्र असलेल्या अग्नी 5 या मिसाईलचे यशस्वी परीक्षण केलं. या क्षेपनास्त्राची मारक क्षमता ही 5000 किमी इतकी आहे.