दिल्लीत साखळी बॉम्बस्फोटात 30 जणांनी प्राण गमावले,13 सप्टेंबर आहे 'या' घटनांचा साक्षीदार
13 September In History : आजच्या दिवशी दिल्लीत 30 मिनिटांच्या अंतराने चार ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. याममध्ये 30 जमांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास 130 लोक जखमी झाले होते.
13 September In History : दिल्लीत 30 मिनिटांच्या अंतराने चार ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. याममध्ये 30 जमांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास 130 लोक जखमी झाले होते. 13 सप्टेंबरचा हा दिवस देशाच्या इतिहासातील दहशतवादाच्या एका मोठ्या घटनेसह नोंदला गेला आहे. दहशतवाद्यांनी दिल्लीतील कॅनॉट प्लेस आणि करोलबागमधील गफ्फार मार्केट तसेच गजबजलेले ग्रेटर कैलास येथे स्फोट घडवून आणले. या बॉम्बस्फोटांमध्ये 30 जणांचा मृत्यू झाला होता तर 90 हून अधिक लोक जखमी झाले होते. 13 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सैन्याने ऑपरेशन पोलो सुरू केले. हैदराबादला भारतात विलीन करणासाठी ही लष्करी कारवाई करण्यात आली होती. भारतीय लष्कराच्या या कारवाईला ऑपरेशन पोलो असे नाव देण्यात आले होते.
2008 दिल्ली बॉम्बस्फोट
13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत 30 मिनिटांच्या अंतराने चार ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. याममध्ये 30 जमांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास 130 लोक जखमी झाले होते. 13 सप्टेंबरचा हा दिवस देशाच्या इतिहासातील दहशतवादाच्या एका मोठ्या घटनेसह नोंदला गेला आहे.
दहशतवाद्यांनी दिल्लीतील कॅनॉट प्लेस आणि करोलबागमधील गफ्फार मार्केट तसेच गजबजलेले ग्रेटर कैलास येथे स्फोट घडवून आणले. या बॉम्बस्फोटांमध्ये 30 जणांचा मृत्यू झाला होता तर 90 हून अधिक लोक जखमी झाले होते. या भीषण दहशतवादी हल्याने दिल्लीच नाही तर संपूर्ण देश हादरला. दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटापूर्वी एका मीडिया हाऊस ई-मेल पाठवला होते आणि पाच मिनिटांत बॉम्बस्फोट होणार आहेत, अशी माहिदी दिली होती. हा ई-मेल इंडियन मुजाहिदीनच्या (आयएम) नावाने करण्यात आला होता. त्यानंतर 2011 पर्यंत या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली होती.
1985 : सुपर मारियो ब्रदर्स हा व्हिडीओ गेम जपानमध्ये प्रकाशित झाला. गेम्सची सुपर मारिओ मालिका सुरू झाली.
90 च्या दशकात सुपर मारियो ब्रदर्स हा विडिओ गेम जपानमध्ये प्रकाशित झाला. या गेम्सची सुपर मारिओ मालिका सुरू झाली. शाळेत फक्त एक माणूस होता जो एक अद्भुत सेनानी होता. तो लांब उडी अशा पद्धतीने मारायचा की तुम्ही बघतच राहाल, असा हा व्हीडीओ गेम होता. 90 च्या दशकात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला या खेळाचे वेड लागले होते. हा व्हिडीओ गेम 13 सप्टेंबर 1985 रोजी रिलीज झाला. गेम शिगेरू मियामोटो यांनी डिझाइन केला होता आणि निन्टेन्डोने प्रकाशित केला होता.
1948 : हैदराबाद मुक्तिसंग्राम ऑपेरेशन पोलो, हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी भारतीय सैन्य हैदराबादच्या हद्दीत शिरले
13 सप्टेंबर 1948 रोजी भारतीय सैन्याने ऑपरेशन पोलो सुरू केले. हैदराबादला भारतात विलीन करणासाठी ही लष्करी कारवाई करण्यात आली होती. भारतीय लष्कराच्या या कारवाईला ऑपरेशन पोलो असे नाव देण्यात आले होते. कारण त्यावेळी हैदराबादमध्ये जगातील सर्वाधिक 17 पोलो मैदाने होती. भारतीय लष्कर हैदराबादमध्ये दाखल होताच पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली खान यांनी संरक्षण परिषदेची बैठक बोलावली. त्यांना विचारले की पाकिस्तान हैदराबादमध्ये काही कारवाई करू शकते का? मीटिंगला उपस्थित ग्रुप कॅप्टन एलवर्थी यांनी नाही म्हणून सांगितल्याने पाकिस्तान काही करून शकला नाही. परंतु, भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान चांगलाच खवळला होता. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रातही हे प्रकरण मांडण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
1944 : दुसरे महायुद्ध , मेलिगालासची लढाई: ग्रीक पीपल्स लिबरेशन आर्मी (ईएलएएस) च्या ग्रीक प्रतिकार शक्ती आणि सहयोगी सुरक्षा बटालियन यांच्यात लढाईची सुरुवात.
दुसऱ्या महायुद्धातील मेलिगालासची लढाईला अतिशय महत्वपूर्ण लढाई मानले जाते. कारण 13 सप्टेंबर 1944 रोजी ग्रीक पीपल्स लिबरेनश आर्मीने ग्रीक प्रतिकार शक्ती आणि त्यांच्या सहयोगी सुरक्षा बटालियासोबत लढाई सुरू केली.
1933 : एलिझाबेथ मॅककॉम्ब्स या न्यूझीलंड संसदेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला ठरल्या
एलिझाबेथ मॅककॉम्ब्स या न्यूझीलंड संसदेवर 13 सप्टेंबर 1933 रोजी निवडून आल्या. न्यूझीलंड संसदेवर निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या.
1899 : मॅकेंडर, ऑलियर आणि ब्रोचेरेल यांनी केनिया पर्वतरांगेमधील सर्वोच्च शिखर (5119 मी - 17057 फूट) बॅटियनवर पहिल्यांदा चढाई केली
मॅकेंडर, ऑलियर आणि ब्रोचेरेल यांनी केनिया पर्वतरांगेमधील सर्वोच्च शिखर असलेल्या बॅटियन या शिखरावर 13 सप्टेंबर 1899 रोजी पहिल्यांदा चढाई केली.
1898 : हॅनीबल गुडविन यांना सेल्यूलॉइड फोटोग्राफिक फिल्मचे पेटंट मिळाले.