Omicron : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर, हवाई वाहतूक मंत्रालयाचा निर्णय
Omicron : चार दिवसांपूर्वी 14 देश वगळता सर्व देशात 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता तो निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे.
नवी दिल्ली : जगभरात आणि देशात ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता 15 डिसेंबरपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने एक आदेश जारी करुन ही घोषणा केली आहेत. अवघ्या चार दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या निर्णयाला स्थगिती दिली गेली आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. चारच दिवसापूर्वी म्हणजे 26 नोव्हेंबरला भारत सरकारने 14 देश वगळता इतर सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. कोरोना महासाथ ओसरत असल्याने हा निर्णय घेण्यात आले असल्याचे म्हटलं गेलं होतं. आता हा निर्णय परत मागे घेण्यात आला आहे.
भारतात कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लागू करण्यात आले होते. काही महिने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प होती. त्यानंतर 'वंदे भारत' विमान सेवा आणि कोव्हिड बबल नियमांनुसार, विमानसेवा सुरू करण्यात आली.
भारत सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या
भारत सरकारनंही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्या गाईडलाईन्सची अमलबजावणी आजपासून केली जाणार आहे. सुधारित गाईडलाईन्सनुसार, संसर्गाचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणं अनिर्वाय असणार आहे. दक्षिण आफ्रिकेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना ज्यांना या व्हेरियंटची लागण झाली आहे त्यांना त्यांच्या स्थानिक वाणिज्य दूतावासांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :