Omicron Cases LIVE: देशावर ओमायक्रॉनचं संकट; जगभरातील प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर
Omicron Cases LIVE Updates: दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंट ओमायक्रॉननं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलंय.

Background
Omicron: जगावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावू लागलंय. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंट ओमायक्रॉननं (Omicron) संपूर्ण जगाला चिंतेत टाकलंय. दक्षिण आफ्रिकेसह 12 देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळू आले आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी प्रवासाच्या नियमावलीत बदल केलाय. मात्र, तरीही देशात ओमायक्रॉन रुग्ण आढळून येत आहेत.
कोरोनाची रुग्ण संख्येत घट होत असताना देशासमोर ओमायक्रॉनच्या रुपात नवं संकट उभं राहिलंय. देशात ओमायक्रॉनचे पहिले दोन रुग्ण कर्नाटकमध्ये आढळून आले. त्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा एक-एक रुग्ण आढळून आलाय. आता दिल्लीत देखील ओमायक्रॉननं शिरकाव केलाय. टांझानियातून परतलेल्या व्यक्तीची ओमायक्रॉन चाचणी सकारात्मक आलीय. यामुळं सध्या देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या पाचवर पोहचलीय. देशातील ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्यानं नागरिक धास्तावून गेले आहेत.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन सध्याच्या औषधांना, लसीला दाद देतोय किंवा नाही, याबाबत डॉक्टर आणि तज्ञ जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, नागरिकांनी घाबरून अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण, ओमायक्रॉन संसर्गाचा वेग पूर्वीच्या डेल्टापेक्षा कितीतरी जास्त आहे. याचबरोबर नागरिकांनी कोरोना निर्बंधांचं पालन करणं आवश्यक आहे.
देशात चार ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळलेल्यामुळं चिंतेचे वातावरण आहे. बंगळुरुमध्ये दोन तर गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळल्याने देशभरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच देशासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात शनिवारी एका दिवसात एक कोटी लसीचे डोस जनतेला देण्याची विक्रमी कामगिरी केलीय. आरोग्य मंत्रालयाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती.
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
ओमायक्रॉनशी दोन हात करण्यासाठी मुंबई कितपत सज्ज?
Omicron Variant in Mumbai : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं देशासह राज्याचीही चिंता वाढवली आहे. सध्या राज्यात 8 ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रशासन सज्ज झालं असून तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना ओमायक्रॉनचं संकट (Omicron Variant) आपण रोखू असंही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी (Suresh Kakani) यांनी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 15 डिसेंबर आधी पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल. शेवटच्या 4-5 दिवसांत पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं आहे.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "आजही कोरोना संपलेला नाही. त्यात आता ओमायक्रॉन आला आहे. मुंबईत ओमायक्रोनचा रुग्ण अजूनही आढळलेला नाही. मुंबई सर्वांच्यात आहे, इकडे अनेकजण कामाला येत असतात. त्यामुळे तो प्रादुर्भाव वाढू नये याची काळजी घेत आहोत. आपण लसीकरण मोठ्या प्रमाणात करत आहोत. सर्व नियम येत असतात. नियमांचे पालनही मुंबईकर करत आहेत. हे संकट आपण रोखू. आताच्या घडीला मिळालेला रुग्ण सौम्य लक्षणं असलेला आहे."























