Omicron Variant : देशाची चिंता वाढली! दिल्लीत ओमायक्रॉनचे दोन नवे रुग्ण, ओमायक्रॉन बाधितांची संख्या 45 वर, महाराष्ट्रात सर्वाधिक 20 रुग्ण
Omicron Variant : देशात ओमायक्रॉनमुळे चिंतेत भर पडली आहे. राजधानी दिल्लीमध्ये दोन नवे आमोयक्रॉन संक्रमित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 45 झाली आहे.
Omicron Variant : देशात ओमायक्रॉनमुळे (Omicron) चिंतेत भर पडली आहे. राजधानी दिल्लीमध्ये दोन नवे आमोयक्रॉन संक्रमित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 45 झाली आहे. दिल्लीतील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता सहा झाली आहे. मंगळवारीही दिल्लीत चार नवीन रुग्ण आढळले होते. सहा पैकी एका रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, सध्या 25 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आणि 3 संशयित दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल आहेत.
देशात ओमायक्रॉनचे 45 रुग्ण
दिल्लीत चार ओमायक्रॉन बाधित आढळल्यानंतर आता देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे. सोमवारी महाराष्ट्रात आणखी दोन जणांना कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे आढळून आले. दोघेही दुबईला गेले होते. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेतून गुजरातला परतलेल्या एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले.
महाराष्ट्रात सर्वाधिक 20 ओमायक्रॉन बाधित
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने लातूरमध्ये एक आणि पुण्यात ओमायक्रॉनचा आणखी एक रुग्ण आढळून आल्याचे सांगितले होते. पुण्यात सापडलेला रुग्ण 39 वर्षीय महिला आहे, तर लातूरमधील संक्रमित 33 वर्षीय पुरुष आहे. त्यामुळे राज्यात ओमायक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या 20 झाली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, दोन्ही रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे नव्हती आणि त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. दोघेही दुबईहून परतले होते.
त्यानुसार, रुग्णांच्या तीन संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला आणि त्यांची तपासणी केली गेली आणि तिघांनाही संसर्ग झाल्याचे आढळले नाही. तसेच, दक्षिण आफ्रिकेतून गुजरातमधील सुरत येथे परतलेल्या 42 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं समोर आले आहे. गुजरात राज्यात ओमायक्रॉनचे चार रुग्ण आढळले आहेत. प्रशासनाने सांगितले की, या व्यक्तीची दिल्लीत चौकशी करण्यात आली होती, ज्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर लक्षणे दिसू लागल्याने त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 784 नवे कोरोनारुग्ण, 41 जणांना ओमायक्रॉनची लागण
- Dangerous Apps : तुमच्या स्मार्टफोनमधील 'हे' अॅप धोकादायक, आताचं करा अनइंस्टॉल
- Netflix च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी, सबस्क्रिप्शन आता फक्त 149 रुपये
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha