Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 784 नवे कोरोनारुग्ण, 41 जणांना ओमायक्रॉनची लागण
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 5784 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे 252 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात ओमायक्रॉन व्हेरियंटचे 41 बाधित सापडले आहेत.
Coronavirus Cases Today in India : जगभरात कोरोना (Corona) कहर सुरूच आहे. मात्र, आता कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 5 हजार 784 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे 252 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात ओमायक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Variant) 41 बाधित सापडले आहेत. जाणून घेऊया देशातील कोरोनाची सध्याची स्थिती...
आतापर्यंत 4 लाख 75 हजार 888 जणांचा कोरोनाबळी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 88 हजार 993 झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 75 हजार 888 इतकी झाली आहे. आकडेवारीनुसार, काल 7 हजार 995 कोरोनाबाधित बरे झाले होते. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 38 हजार 763 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आतापर्यंत 133 कोटींहून अधिक डोस दिले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 133 कोटींहून अधिक कोरोना विषाणू लसींचे डोस देण्यात आले आहेत. सोमवारी 66 लाख 98 हजार 601 डोस देण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत कोरोना लसीचे 133 कोटी 88 लाख 12 हजार 577 डोस देण्यात आले आहेत.
देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 41 वर
देशात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. सोमवारी महाराष्ट्रात आणखी दोन जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. दोघेही दुबईला गेले होते. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेतून गुजरातला परतलेल्या एका व्यक्तीलाही ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. देशात आतापर्यंत 41 लोकांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
इतर बातम्या :
- विधान परिषद निवडणूक: नागपूरमध्ये चमत्कार झालाच नाही, भाजपचा दणदणीत विजय, महाविकास आघाडीची मते फुटली
- Netflix च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी, सबस्क्रिप्शन आता फक्त 149 रुपये
- अवघा रंग एक झाला... मोक्षदा एकादशी निमित्त विठुरायाच्या मंदिराला आकर्षक सजावट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha