Omicron : धोक्याची घंटा! देशात 200 ओमायक्रॉनबाधित, दिल्लीत एका दिवसात 24 रुग्ण
Omicron Cases in India : देशातील ओमायक्रॉन (Omicron)बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. सोमवारी केवळ दिल्लीमध्ये 20 हून अधिक नवे ओमायक्रॉनग्रस्त आढळले आहेत.
Omicron Cases in India : देशातील ओमायक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. सोमवारी केवळ दिल्लीमध्ये 20 हून अधिक नवे ओमायक्रॉनग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 200 वर पोहोचली आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 20 हून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. आता दिल्लीतील ओमायक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या 54 झाली आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 200 वर
देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका पाहायला मिळतोय. दिल्लीत सोमवारी दिवसभरात ओमायक्रॉनचे 24 नवे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत रविवारीही आठ नव्या ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली होती. त्यामुळे दिल्लीतील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 54 झाली आहे. तर महाराष्ट्रातील ओमायक्रॉनबाधितांचा आकडाही 54 झाला आहे.
देशातील कोरोनाची आतापर्यंतची स्थिती
देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तसात देशभरात 5 हजार 326 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 453 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाबरोबरच ओमायक्रॉनचा धोका देखील वाढतोय. देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 200 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांची चिंता वाढलीय.
ख्रिसमस सेलिब्रेशन ठरू शकतं घातक
देशात एकीकडे ओमायक्रॉन व्हेरियंटचा (Omicron Variant) धोका वाढत असताना लोक ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या (New Year Celebration) तयारीला लागले आहेत. मात्र जगात काही देशांनी सतर्कता बाळगत ख्रिसमस आणि नवे वर्ष साजरं करण्यावर निर्बंध लावले आहेत. केंद्र सरकारने ख्रिसमस आणि नवं वर्ष साजरे करण्यावर निर्बंध लावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Tesla Baby : कार ऑटोपायलट मोडवर, महिलेने फ्रंट सीटवरच बाळाचा जन्म, नक्की काय घडलं?
- Trending : तीन वर्षांपूवी झाडासोबत लग्न, आडनावही बदललं, आता नवा बॉयफ्रेंड
- Ankita Lokhande चा पति Vicky Jain कोण आहे? जाणून घ्या मालमत्तेसह कार कलेक्शनची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha