(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक 10 वर्षानंतर विदेश दौऱ्यावर
Odisha News : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक एका दशकानंतर म्हणजेच 10 वर्षानंतर विदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.
Odisha Chief Minister Naveen Patnaik : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) जवळपास दशकभरानंतर परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. नवीन पटनायक यांचा याधी 2012 मध्ये विदेश दौरा झाला. यावेळी ते आंतरराष्ट्रीय विकास विभागाच्या (DFID) निमंत्रणावर लंडनला गेले होते. मात्र त्यांचे जवळचे सहकारी दिवंगत प्यारी मोहन महापात्रा यांनी केलेल्या कथित बंडानंतर त्यांना त्यांचा दौरा अर्धवट सोडावा लागता होता. दरम्यान, त्यांनी 22 वर्षांच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री असताना देशाबाहेर जाणं टाळलं. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांना कार्य आणि हितसंबंध वाढवण्यासाठी परदेश दौरे करण्याची परवानगी दिली.
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक 28 जून रोजी परदेश दौऱ्यावर जाणार आहे. राज्यातील उद्योगांना चालना देण्याच्या उद्देशाने काही कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी पटनायक संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि रोमला देशात दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.
इंडस्ट्रियल प्रमोशन अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ ओडिशा लिमिटेड (IPICOL) आणि दुबई-स्थित भारतीय वाणिज्य दूतावास यांच्याद्वारे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीद्वारे (FICCI) आयोजित केलेल्या गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात नवीन पटनायक सहभागी होतील. पटनायक दुबईत राहणाऱ्या ओडिया (अनिवासी ओडिया) भाषिकांच्या सभेला संबोधित करणार आहेत.
सीए राजीव शेखर साहू यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिकरित्या परदेशात जाणे आणि गुंतवणूकदारांना आमंत्रित करणं याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल.' मुख्यमंत्री नवीन पटनायक गुंतवणूकदारांच्या बैठकीसाठी रोमला जाण्याची शक्यता आहे. व्हॅटिकन सिटीतील कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची ते भेट घेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या