एक्स्प्लोर

कोरोनाचा पुन्हा वाढतोय धोका, बूस्टर डोसमध्ये भारत मागे का? जाणून घ्या काय आहे कारण

Status of Precaution Dose: कोरोना महामारीविरुद्धच्या लढाईत जगातील अनेक देश बूस्टर डोसकडे एक आशा म्हणून पाहत आहेत.

Status of Precaution Dose: कोरोना महामारीविरुद्धच्या लढाईत जगातील अनेक देश बूस्टर डोसकडे एक आशा म्हणून पाहत आहेत. बूस्टर डोस घेल्यास कोरोनामुळे होणारे गंभीर आजार आणि मृत्यू टाळण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळेच केंद्र सरकारने ही देशभरात वृद्ध, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना बूस्टर डोस देण्याचे काम सुरू केले आहे. असं असलं तरी जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत अजूनही नागरिकांना बूस्टर डोस देण्यामध्ये मागे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत 6 जून 2022 पर्यंत 18 ते 59 वयोगटातील 26.77 लाख नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 3.67 कोटी भारतीय नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आले आहे. 

जगभरात आतापर्यंत किती टक्के लोकांना देण्यात आले बूस्टर डोस? 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयने दिलेल्या माहितीनुसार, भारतात 2.6 टक्के लोकांना बूस्टर डोस देण्यात आले आहे. तर युरोपियन युनियन 53 टक्के, संयुक्त राष्ट्र 31 टक्के, ब्राझील 46 टक्के, इंडोनेशिया 14 टक्के जपान 60 टक्के, जर्मनी 66 टक्के,  रशिया 10 टक्के,  फ्रान्स 51 टक्के आणि इंग्लंडच्या 51 टक्के नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. या सर्व देशांच्या तुलनेत आपल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्यास भारत सर्वात मागे आहे.

बूस्टर डोस नागरिकांना देण्यात भारत मागे का? 

देशभरात 18 ते 59 वर्षे वयोगटातील सरासरी प्रतिदिन 46,977 लोकांना बूस्टर डोस देण्यात येत आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. केंद्र आणि राज्य सरकार नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन करत आहे. मात्र नागरिक या आवाहनाला प्रतिसाद देताना दिसत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे लोकांमध्ये कोरोनाची कमी होत असलेली भीती. यामुळे लसीकरांकडे लोक पाठ फिरवत आहेत. 

बूस्टर डोस का आहे महत्वाचा? 

कोविड-19 लसीचा बूस्टर डोस हा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. साथीच्या रोगापासून कुटुंब आणि समाजाचे संरक्षण करण्यासाठी हा डोस घेणं महत्त्वपूर्ण आहे. या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी बूस्टर शॉट्स आवश्यक आहे. अमेरिकेत दुसऱ्या लाटेत बूस्टर डोस घेतल्याने अनेक कोरोना रुग्णाची रुग्णालयात दाखल होण्याची आणि मृत्यूची शक्यता 90% पेक्षा जास्त कमी झाली होती. भारतात खाजगी लसीकरण केंद्रांवर 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोविड लसीचा बूस्टर डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे. 18 वर्षांहून अधिक वय असलेले आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिने पूर्ण झालेले सर्व लोक बूस्टर डोस घेऊ शकतात. 

भारतात कोरोना रुग्ण संख्येत होत आहे वाढ 

Date

Per Day Corona Cases in India

May-31

2,338

Jun-01

2,745

Jun-02

3,712

Jun-03

4,041

Jun-04

3,962

Jun-05

4,270

Jun-06

4,518

Source: Bloomberg Vaccine Tracker

22 जूनला येणार कोरोनाची चौथी लाट : आयआयटी कानपूर

दरम्यान, भारतातील कोविड-19 साथीची चौथी लाट 22 जूनच्या आसपास सुरू होऊ शकते आणि ऑगस्टमध्ये ही लाट ओसरेल, असे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-कानपूर येथील संशोधकांनी केलेल्या मॉडेलिंग अभ्यासात सांगितले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget