Unmarried Youth In India: देशात वाढत आहे अविवाहित तरुणांची संख्या, जम्मू-काश्मीर या बाबतीत आघाडीवर
Unmarried Youth In India: देशात गेल्या काही वर्षांत अविवाहित तरुणांची संख्या वाढली आहे. सरकारने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
Unmarried Youth In India: देशात गेल्या काही वर्षांत अविवाहित तरुणांची संख्या वाढली आहे. सरकारने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये देशातील 15-29 वयोगटातील अविवाहित व्यक्तींचे प्रमाण 23 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 2011 मध्ये हे प्रमाण 17.2 टक्के होते. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने हा अहवाल जारी केला आहे.
राष्ट्रीय युवा धोरण-2014 नुसार, देशातील 15 ते 29 वयोगटातील लोकांची युवा म्हणून विभागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ताज्या अहवालानुसार, 2011 मध्ये देशात कधीही लग्न न केलेल्या पुरुषांची लोकसंख्या 20.8% होती. 2019 मध्ये हे प्रमाण वाढून 26.1 टक्के झाले आहे. सर्वेक्षणानुसार, कधीही लग्न न केलेल्या महिलांच्या प्रमाणातपही अशीच वाढ नोंदवण्यात आली आहे. सर्वेक्षणानुसार, 2011 मध्ये अविवाहित महिलांचे प्रमाण 13.5 टक्के होते. जे 2019 मध्ये वाढून 19.9 टक्के झाले आहे.
अविवाहित तरुणांच्या संख्येत जम्मू-काश्मीर आघाडीवर
सर्वेक्षणानुसार, 2019 मध्ये देशात जम्मू-काश्मीरमध्ये कधीही लग्न न केलेल्या तरुणांची सर्वाधिक टक्केवारी होती. त्यानंतर उत्तर प्रदेश दुसऱ्या, दिल्ली तिसऱ्या आणि पंजाब चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशात देशाच्या इतर भागांच्या तुलनेत तरुणांचे लग्न न होण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे.
दरम्यान सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, देशातील तरुणाची लोकसंख्या वाढण्याची अपेक्षा आहे. परंतु 2011-2036 या कालावधीच्या उत्तरार्धात ती कमी होण्यास सुरुवात होईल. देशातील एकूण तरुण लोकसंख्या 1991 मध्ये 22.27 कोटी होती. जी 2011 मध्ये 33.34 कोटी झाली आणि 2021 पर्यंत ती 37.14 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 2036 पर्यंत 34.55 कोटींवर येईल.
इतर महत्वाच्या बातम्या:
Presidential Election 2022 : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या एकीला आठवडाभरात तिसरा धक्का!
NIRF Ranking 2022: NIRF कडून भारतातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांचे मानांकन घोषीत, महाराष्ट्राचे नाव नाही, आश्चर्याची बाब समोर
Monkeypox Guidelines : देशात मंकीपॉक्सचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क, आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी