(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Monkeypox Guidelines : देशात मंकीपॉक्सचा शिरकाव झाल्याने प्रशासन सतर्क, आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी
Monkeypox Guidelines : देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मंकीपॉक्सचा धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Monkeypox Guidelines : देशात मंकीपॉक्सचा (Monkeypox Virus) पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मंकीपॉक्सचा धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) मार्गदर्शक सूचना (Monkeypox Guidelines) जारी केल्या आहेत. देशात केरळमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा पहिला रुग्ण सापडला आहे. जगभरात अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव झाला आहे. त्यानंतर आता भारतात केरळमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार, आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आजारी लोकांसोबत जवळचा संपर्क टाळावा. याशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी मृत किंवा जिवंत प्राण्यांसोबतचा जवळचा संपर्कही टाळावा.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना
- आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी आजारी व्यक्तीसोबतचा संपर्क टाळावा. त्वचेशी आणि खाजगी भागांतील जखमा किंवा आजार असलेल्या व्यक्तीशीही संपर्क टाळावा.
- आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी कोणत्याही जिवंत किंवा मृत सस्त प्राण्यासोबत संपर्क टाळावा. यामध्ये उंदीर, खार, माकड या प्राण्यांसोबत संपर्क टाळावा.
- जंगली प्राण्यांचे मांस खाणं टाळा.
- कोणत्याही आजारी व्यक्तीच्या वापरातील वस्तू वापरू नका.
Ministry of Health and Family Welfare releases guidelines for the management of Monkeypox disease
— ANI (@ANI) July 15, 2022
As per the ministry's guidelines, international passengers should avoid close contact with sick people, contact with dead or live wild animals and others. pic.twitter.com/44ndGll6J3
मंकीपॉक्सबाबत राज्यांसाठीटी मार्गदर्शक तत्त्वे
- देशात प्रवेशाच्या प्रत्येक ठिकाणी लक्षणे नसलेल्या आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी वैद्यकीय तपासणी पथके, डॉक्टर, चाचणी, ट्रेसिंग आणि पाळत ठेवणारी पथके तयार करावीत. तसेच, वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार रुग्णालयात उपचार आणि क्लिनिकल व्यवस्थापनाची व्यवस्था असावी.
- सर्व संशयित प्रकरणांची तपासणी एंट्री पॉईंट्स आणि समुदायांवर (एकतर हॉस्पिटल आधारित पाळत ठेवून, गोवर अंतर्गत लक्ष्यित पाळत ठेवून, किंवा एमएसएम, FSW लोकसंख्येसाठी NACO द्वारे ओळखल्या गेलेल्या पाळत ठेवणे किंवा हस्तक्षेप साइटवर) केली जाईल.
- रुग्णाला विलगीकृत करणे (सर्व जखमा पूर्ण होईपर्यंत आणि खवले पूर्णपणे निघून जाईपर्यंत), लक्षणात्मक आणि सहाय्यक उपचार, वारंवार देखरेख आणि वेळेवर उपचार हे मृत्यू टाळण्यासाठी महत्वाचे उपाय आहेत.
- मंकीपॉक्सच्या संशयित पुष्टी झालेल्या प्रकरणांचे व्यवस्थापन करण्यासाठी सुसज्ज रुग्णालय आणि पुरेसे मानवी संसाधन उपलब्ध असावीत.
केरळमध्ये आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण
मागील काही दिवसांपासून मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूचा जगभर धुमाकुळ घातला आहे. आतापर्यंत 20 हून देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव झाला आहे. आता केरळच्या कोल्लममध्ये देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या