(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आजपासून रेल्वे तिकीटांचं सुपरफास्ट बुकिंग, एका मिनिटात 10 हजार तिकीटांचं बुकिंग शक्य
रेल्वे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये आता अडचणी येणार नाहीत. कारण आयआरसीटीची वेबसाईट अपग्रेड होणार आहे. त्यामुळे आता केवळ एका मिनिटात एकाच वेळी दहा हजार रेल्वे तिकीटांचं बुकिंग शक्य होणार आहे.
नवी दिल्ली : रेल्वे तिकीटांचं बुकिंग आजपासून सुपरफास्ट होणार आहे. रेल्वे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंगमध्ये आता अडचणी येणार नाहीत. कारण आता केवळ एका मिनिटात एकाच वेळी दहा हजार रेल्वे तिकीटांचं बुकिंग शक्य होणार आहे. सध्या एका मिनिटात 7500 तिकीटं बुक होतात. रेल्वेमंत्री पियुष गोयल आज दुपारी आयआरसीटीसीची नवी वेबसाईट लॉन्च करणार आहेत.
रेल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आयआरसीटीसीची वेबसाईट अपग्रेड झाल्यानंतर तिकीट बुकिंगचा वेग वाढणार आहे. परिणामी प्रवाशांना आधीच्या तुलनेत जास्त वेगाने तिकीट बुक करता येणार आहे. सोबतच आयआरसीटीसीच्या वेबसाईटद्वारे खाण्यापिण्यासह इतर सोयी-सुविधाही मिळणार आहेत.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉरपोरेशन अर्थात आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुक करता येतात. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, 2014 नंतर तिकीट बुकिंगसोबतच प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी यावर भर दिला जात आहे.
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचं म्हणणं आहे की, "आयआरसीटीसी वेबसाईट ही रेल्वे प्रवाशांसाठी संपर्काचं पहिलं केंद्र आहे आणि हा अनुभव चांगला असावा.""नव्या डिजिटल इंडिया अंतर्गत जास्तीत जास्त लोकांचा ओढा आता आरक्षण खिडकीवर जाण्याऐवजी ऑनलाईन तिकीट बुक करण्याच्या दिशेने आहे. यासाठीच आयआरसीटीसीची वेबसाईट सातत्याने अपग्रेड करण्यासाठी आवश्यक आहे.
रेल्वे बोर्ड, आयआरसीटीसी, सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टम्स (क्रिस) च्या अधिकाऱ्यांनी पियुष गोयल यांना आश्वासन दिलं की, वेबसाईटचं काम आणखी उत्तम करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जातील.