एक्स्प्लोर

ठाण्यानंतर आणखी एक मोठी दुर्घटना; लिफ्ट कोसळून चार जणांचा जागीच मृत्यू, इमारतीचं बांधकाम सुरु असताना घडला अपघात

आम्रपाली ग्रुपच्या एका इमारतीचे काम सुरू होते. यामध्ये आधी चार कामगारांचा मृत्यू झाला आहे तर जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.  

नवी दिल्ली : नोएडामध्ये ग्रेटरच्या बिसरख कोतवाली  परिरातील आम्रपाली इमारतीमध्ये  लिफ्ट कोसळून अपघात झाला आहे. अपघातात चार  जणांचा जागीच  मृत्यू झाला असून पाच  जण जखमी झाले आहेत. आम्रपाली ग्रुपच्या एका इमारतीचे काम सुरू होते. यामध्ये आधी चार कामगारांचा मृत्यू झाला आहे तर जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.  दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

गौर सिटी एक मूर्तीजवळ इमारतीचे काम सुरू होते. काम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेक चार जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. दुर्घटना घडली त्यावेळी लिफ्टमध्ये बांधकामसाठीचे साहित्य आणि कामगार होते. मृत कामगारांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. सर्व मृत कामगार हे बिहारच्या किशनपूरच्या टभका गावात राहणारे होते. 

ठाण्यामध्येही घडला होता प्रकार 

ठाण्याच्या बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या 40 मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळली. यामध्ये सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.  तर काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. नुकतंच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटरप्रुफिंगचे काम सुरू होतं. वॉटरप्रुफिंगचं हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा

Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?Piyush Goyal Mumbai : मविआवर सडकून टीका ते भाजपचा पुढील प्लॅन; पियूष गोयल यांच्यासोबत बातचीतAvadiche Khane Ani Rajkiya Tane Bane: झणझणीत मिसळवर ताव,Aditi Tatkare यांच्यासोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला

VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले

×
Embed widget