एक्स्प्लोर
Advertisement
LIVE: अविश्वास प्रस्ताव: कमकुवत विरोधक भाजपविरोधात एकवटले: राजनाथ सिंह
No Confidence Motion केंद्रातील मोदी सरकारविरोधात संसदेत आज अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे.
No Confidence Motion नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारविरोधात संसदेत आज अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. सरकारकडून विजयाचा दावा केला जात आहे, तर अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारविरोधातला रोष विरोधक जनतेसमोर आणणार आहेत.
अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलगू देसम आक्रमक झाला आहे. भाजपविरोधात तेलुगु देसमनं अविश्वास प्रस्ताव आणलाय. याला काँग्रेससह बहुतोक सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. लोकसभेत भाजपचं बहुमत अगदी काठावरचं आहे. त्यामुळं भाजप बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अविश्वास ठराव लाईव्ह अपडेट
भाजप 2 सदस्यांवरुन आज बहुमताने संसदेत आहे. मोदी सरकारने महिला, वृद्ध, गरीब, ग्रामीणांसाठी मोठं काम केलं: राजनाथ सिंह 4.00 PM - विरोधक खूपच कमकुवत, त्यामुळेच सर्वजण मिळून भाजपविरोधात एकवटले : राजनाथ सिंह 3.45 PM राहुल गांधींच्या विरोधात भाजप हक्कभंग प्रस्ताव आणणार- संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांची माहिती, खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप. तुमच्या मनात माझ्याबद्दल राग आहे. तुम्ही मला पप्पू म्हणू शकता, शिव्या देऊ शकता. मात्र माझ्या मनात तुमच्याबद्दल द्वेष नाही, असं म्हणत राहुल गांधी मोदींकडे जाऊन त्यांची गळाभेट घेतली. भाजपसाठी मी पप्पू, पण माझ्या मनात मोदी, भाजपविषयी राग नाही - राहुल गांधीराहुल गांधींनी आपल्या जागेवरुन उठून मोदींकडे जाऊन त्यांची गळाभेट घेतली - राहुल गांधी राफेल कराराबाबत पुराव्याशिवाय सभागृहात आरोप करणं गैर, राहुल गांधींनी माफी मागावी, भाजपची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकीदार नव्हे तर भागीदार आहेत : राहुल गांधी मोदी गुजरातेत चीनच्या राष्ट्रपतींसोबत झोके घेत होते, त्यावेळी सीमेवर चीनचं सैन्य घुसलं होते : राहुल गांधी पंतप्रधानांनी एखाद्या जादूप्रमाणे राफेल कराराची किंमत वाढवली, 520 कोटींचं विमान 1600 कोटींना खरेदी केलं, संरक्षणमंत्रीही खोटं बोलल्या : राहुल गांधी नोटाबंदी हा मोदींचा सर्वात मोठा विनोद, जीएसटीने कोट्यवधींना लुबाडलं, बड्या उद्योगपतींसाठी मोदी काम करतात, शेतकरी, बेरोजगार, तरुणांची पदरी केवळ भूलथापा - राहुल गांधी तुम्ही रोजगाराच्या नावाने भजी तळण्याचा सल्ला दिला, राहुल गांधीचं मोदी सरकारवर टीकास्त्र चीन 24 तासात 50 हजार युवकांना रोजगार देतो, मात्र तुम्ही (मोदी सरकार) 24 तासात अवघ्या 400 युवकांना रोजगार देता : राहुल गांधी देशातील जनता जुमलेबाजीने पीडित, जुमला नं. 1) प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जुमला नं. 2) 2 कोटी युवकांना रोजगार : राहुल गांधी 1.05 राहुल गांधी लाईव्ह 12.10PM अविश्वास प्रस्ताव - व्हिप जारी करण्यावरुन शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, शिवसेनेचा व्हिप अस्तित्त्वातच नव्हता, कुणीतरी खोडसाळपणे खोटा व्हिप जारी केला: चंद्रकांत खैरे, प्रतोद, शिवसेना या देशात पुतळ्यांसाठी जास्त पैसे मिळतात, मात्र विकास कामांना पैसे मिळत नाहीत : जयदेव गल्ला, खासदार टीडीपी, आंध्रप्रदेश महाराष्ट्रात छत्रपती शिवराय आणि गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांना जेवढा पैसा मिळाला, त्यापेक्षा कमी पैसा आंध्र प्रदेशला विकासासाठी मिळाला : जयदेव गल्ला, खासदार टीडीपी, आंध्रप्रदेश 11.45 AM - आंध्र प्रदेशला कर्जाचा डोंगर दिला, उत्पन्नाचे मार्ग बंद केले, केंद्र सरकारने आंध्राच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसली : जयदेव गल्ला, खासदार टीडीपी, आंध्रप्रदेश 11.26 AM - मोदी सरकारने तेलंगणाला झुकतं माप दिलं, आंध्र प्रदेशला एक पैसाही दिला नाही : जयदेव गल्ला, खासदार टीडीपी, आंध्रप्रदेश 11. 25 AM - आम्ही मोदी सरकारला इशारा नाही तर शाप देतोय : जयदेव गल्ला, खासदार टीडीपी, आंध्रप्रदेश 11.20 AM - आम्ही कुणीच आज सभागृहाच्या हजेरी पटावर स्वाक्षरी केलेली नाही. आम्हाला या वादात पडायचं नाहीय.सविस्तर भूमिका उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील - शिवसेना खासदार आनंदराव अडसूळराहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भर सभागृहात गळाभेट घेतली! pic.twitter.com/dW4AqhKrXz
— ABP माझा (@abpmajhatv) July 20, 2018
11. 15 AM मोदी सरकारने आंध्र प्रदेशवर अन्याय केला, मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, भेदाची भावना ठेवली, त्यामुळे आंध्राच्या 5 कोटी जनतेच्यावतीने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव : जयदेव गल्ला, खासदार टीडीपी, आंध्रप्रदेश 11.12 AM : अविश्वास प्रस्तावावर संध्याकाळी 6 वा. मतदान, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची माहिती 11.10 AM लोकसभेत चर्चेला सुरुवात, चर्चेसाठी काँग्रेसकडून वेळ वाढवून देण्याची मागणी, बीजेडीचा सभात्याग 11. 00 AM - लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु 10.53 AM शिवसेना मतदान करणार नाही, तटस्थ राहणार, सेनेचे खासदार सभागृहात जाणार नाहीत : संजय राऊतपूर्ण कामकाजावर बहिष्कार. आम्ही कुणीच आज सभागृहाच्या हजेरी पटावर स्वाक्षरी केलेली नाही. आम्हाला या वादात पडायचं नाहीय.सविस्तर भूमिका उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील. @abpmajhatv pic.twitter.com/S3qF2etU69
— prashant kadam (@_prashantkadam) July 20, 2018
10.47 AM शिवसेना तटस्थ राहणार, मतदान करणार नाही 10.09 AM - पंतप्रधान नरेंद्र मोदी वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करणार शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत सभागृहात अविश्वास प्रस्तावावर पक्षाची बाजू मांडणार बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही, शिवसेनेचा 'सामना'तून भाजपवर हल्लाबोल मोदींचं ट्विट सरकारची आज अग्निपरीक्षा असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचं म्हटलं आहे. मोदी म्हणाले, “संसदीय लोकशाहीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मला खात्री आहे माझे सहकारी खासदार यावेळी उपस्थित राहून विधायक, व्यापक आणि विनाव्यत्यत चर्चा करतील. देशातील जनतेचं आपल्यावर बारीक लक्ष आहे. त्यामुळे जनता आणि घटनाकारांना अपेक्षित कामगिरी करु”#अविश्वास_प्रस्ताव : शिवसेना तटस्थ राहणार, मतदान करणार नाही: संजय राऊत @7_ganesh @rautsanjay61 pic.twitter.com/eNxWjfkeSE
— ABP माझा (@abpmajhatv) July 20, 2018
शिवसेनेची भूमिका दरम्यान आता अविश्वास प्रस्तावाला काही तास उरले असतानाही, शिवसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. कारण, काल दुपारी शिवसेनेचे लोकसभेतील प्रतोद चंद्रकांत खैरे यांच्या स्वाक्षरीसह एक व्हिप जारी करत मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, माध्यमांमध्ये जाहीर झालेला व्हिप म्हणजे खोडसाळपणा असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. कारण अशाप्रकारचा कुठलाही व्हिप शिवसेनेनं जारी केला नसल्याचा दावा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. काँग्रेसचा दावा यूपीए प्रमुख सोनिया गांधींनी आपल्याकडे पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा केला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विरोधकांकडून अविश्वास प्रस्तावाची नोटीस देण्यात आली, जी लोकसभा अध्यक्षांनी स्वीकारली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी यावर चर्चा आणि मतदानासाठी शुक्रवार म्हणजेच आजची वेळ दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसकडून पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी अविश्वास प्रस्ताव चर्चेदरम्यान बोलतील. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी संसदेत बोलण्याची शक्यता कमीच आहे. अविश्वास प्रस्तावात विविध पक्षांनी बोलण्याची वेळ ठरवण्यात आली आहे. पक्षाच्या संख्येनुसार वेळ ठरवण्यात आली आहे. भाजपला सर्वाधिक 3 तास 33 मिनिट बोलण्यासाठी वेळ मिळेल, तर काँग्रेसला 38 मिनिटे वेळ देण्यात आली आहे. यासोबतच एआयएडीएमके 29 मिनिट आणि टीएमसीला 27 मिनिटे देण्यात आले आहेत. कोणत्या पक्षाला किती वेळ? भाजप- 3 तास 33 मिनिट काँग्रेस- 38 मिनिट AIADMK- 29 मिनिट टीएमसी- 27 मिनिट बीजेडी- 15 मिनिट शिवसेना- 14 मिनिट टीआरएस- 9 मिनिट टीडीपी- 13 मिनिट सीपीआयएम- 7 मिनिट एनसीपी- 6 मिनिट एसपी- 6 मिनिट एलजेएसपी- 5 मिनिट शिरोमणी अकाली दल, आरएलएसपी, एडी- 12 मिनिट इतर - 26 मिनिट कसं असेल चर्चेचं स्वरुप? लोकसभेचं कामकाज आज सकाळी अकरा वाजता सुरु होईल. सभागृहात प्रश्नोत्तराचा काळ होणार नाही आणि लंचही नसेल. अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी सात तासांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. सरकारच्या वतीने पाच मोठे नेते आणि मंत्री चर्चेत सहभाग घेतील. पाठिंब्यासाठी टीडीपीचं समर्थन अभियान अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा द्या या मागणीसाठी टीडीपीच्या खासदारांनी दिवसभर समर्थन अभियान राबवलं. टीडीपी नेत्यांनी सहा गट बनवून एनडीए आणि यूपीएच्या नेत्यांशी चर्चा केली. एनडीएतील अकाली दल, जेडीयू आणि इतर पक्षांच्या नेत्यांकडे समर्थनाची मागणी केली. टीडीपीने यासोबतच हिंदी, इंग्रजी, मराठी, बंगाली, तामिळ, मल्याळम यासह इतर भाषांमध्ये एक पुस्तिका वाटली, ज्यामध्ये आंध्र प्रदेशसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिलेल्या आश्वासनांचा समावेश आहे. टीडीपीचे खासदार जयदेव गल्ला अविश्वास प्रस्तावावर चर्चेची सुरुवात करतील. टीडीपीचाच अविश्वास प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. टीडीपीने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी एनडीएची साथ सोडली होती. एआयएडीएमकेचं मत सरकारच्या बाजूने तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानिसामी यांनी सरकारच्या बाजूने मत देणार असल्याचे संकेत दिले. एआयएडीएमके हा तामिळनाडूतील सत्ताधारी आणि लोकसभेतील सर्वात मोठा तिसरा (37) पक्ष आहे. टीडीपीने आंध्र प्रदेशच्या मुद्द्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. एआयएडीएमकेच्या खासदारांनी जेव्हा कावेरी बोर्डाच्या मागणीसाठी आवाज उठवला तेव्हा कुणीही पाठिंबा दिला नाही, असं पलानिसामी म्हणाले. काय आहे अविश्वास ठराव? अविश्वास दर्शक ठरावाचा साधा सोपा अर्थ म्हणजे सभागृहाचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही हे दाखवून देणं घटनेच्या कलम 75 नुसार मंत्रिमंडळ सामूहिकरीत्या सभागृहाला जबाबदार असतं सरकारच्या एखाद्या निर्णयाविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करायचा अधिकार कुठल्याही सदस्याला आहे मात्र अशा नोटिसीला किमान 50 खासदारांची सहमती आवश्यक आहे. त्यानंतर 10 दिवसांच्या आत यावर चर्चा होऊन मतदान घेतलं जातं. मतदानात जर सरकारला बहुमत जिंकता आलं नाही तर सरकार कोसळू शकतं, पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागतो. सभागृहातलं संख्याबळ पाहिलं तर मोदी सरकारला आकड्यांची फार चिंता नाही. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीवर टीडीपी खासदारांनी हा अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला असला तरी यानिमित्ताने चार वर्षांचे हिशेब चुकते करण्याची संधी अनेकांना मिळणार आहे. मोदी सरकार जनतेचा विश्वास गमावत चाललंय हे सांगण्यासाठी, विरोधकांची एकजूट दाखवण्यासाठी या अविश्वास प्रस्तावाला काँग्रेसने समर्थन दिलं आहे. अविश्वास प्रस्तावाचा रंजक इतिहास मोदी सरकारच्या विरोधात शुक्रवारी येणारा अविश्वास प्रस्ताव हा लोकसभेच्या इतिहासातला 27 वा असणार आहे. देशाच्या इतिहासात सर्वाधिक 15 वेळा अविश्वास प्रस्ताव इंदिरा गांधी पंतप्रधान असताना दाखल झाले आहेत. लोकसभेतला पहिला अविश्वास प्रस्ताव 1963 मध्ये नेहरुंच्या सरकारविरोधात दाखल झाला होता. तो दाखल करणारे होते समाजवादी नेते आचार्य जे बी कृपलानी लाल बहादूर शास्त्री, पी व्ही नरसिंहराव यांना एकाच टर्ममध्ये तीन अविश्वास प्रस्तावांना सामोरं जावं लागलं होतं. 1979 मध्ये मोरारजी देसाई यांच्या सरकारविरोधात यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेसकडून अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. ज्यामुळे मोरारजींचं सरकार कोसळलं. 1999 मध्ये अविश्वास प्रस्तावाला सामोरं जाताना वाजपेयींचं सरकार अवघ्या एका मताने कोसळलं शुक्रवारी लोकसभेत दाखल होणारा अविश्वास प्रस्ताव हा तब्बल 15 वर्षानंतर येतोय. शेवटचा प्रस्ताव 2003 साली वाजपेयींच्या सरकारविरोधात दाखल झाला होता. गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर राजीनामा दिलेल्या संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं म्हणून हा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. मात्र 1999 च्या तुलनेत मजबूत स्थितीत असल्याने त्यावेळी वाजपेयी सरकारने तो जिंकला होता. लोकसभेतील संख्याबळ लोकसभेत एकूण 543 जागा आहेत, ज्यामध्ये सध्या दहा जागा खाली आहेत. सत्ताधारी एनडीएमध्ये भाजपकडे 272, एलजेपी सहा आणि इतर पक्षांच्या 16 जागा मिळून आकडा 294 पर्यंत जातो. तर यूपीएकडे काँग्रेस 48, राष्ट्रवादी काँग्रेस 7, आरजेडी 4 आणि अन्य आठ जागा मिळून आकडा 67 पर्यंत जातो. एआयडीएमकेने अविश्वास प्रस्तावामध्ये सरकारची बाजू देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्याकडे 37 खासदार आहेत. त्यामुळे एनडीए प्लसचा आकडा 331 पर्यंत जातो. यूपीएमध्ये काँग्रेस 48, इतर मित्रपक्ष 19 आणि इतर पक्षांच्या जागा (117) मिळून यूपीए प्लसचा आकडा 184 होतो. शिवसेनेची भूमिका अद्यापही ठरलेली नाही. मोदी सरकार सुरक्षित कशामुळे? लोकसभेत 543 जागा आहेत, मात्र 10 जागा खाली असल्यामुळे सदस्यसंख्या 533 होते. यापैकी बहुमतासाठी 268 जागांचीच गरज आहे. भाजपकडेच स्वतःचे 272 खासदार आहेत. एनडीएच्या खासदारांचा यामध्ये समावेश केल्यास आकडा 349 पर्यंत जातो, जो बहुमतापेक्षा 44 ने जास्त आहे. एआयडीएमके (37), बीजेडी (19), टीआरएस (11) या पक्षांच्या भूमिकेकडेही लक्ष असेल. संबंधित बातम्या अविश्वास प्रस्ताव : 11 वाजता चर्चेला सुरुवात, सात तासांची वेळ राखीव स्पेशल रिपोर्ट : अविश्वास ठराव मोदी सरकारसाठी संधी की धोका?Today is an important day in our Parliamentary democracy. I am sure my fellow MP colleagues will rise to the occasion and ensure a constructive, comprehensive & disruption free debate. We owe this to the people & the makers of our Constitution. India will be watching us closely.
— Narendra Modi (@narendramodi) July 20, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement