एक्स्प्लोर
पुण्याच्या दिशेने येणारी 'झेलम एक्सप्रेस' घसरली
नवी दिल्ली: जम्मूहून पुण्याकडे येणाऱ्या झेलम एक्स्प्रसेला अपघात झाला आहे. जालंधरवरुन लुधियानाला जाणाऱ्या झेलम एक्स्प्रेसचे 9 डबे रुळावरुन घसरले आहेत. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मध्यरात्री 3 ते 3.30 च्या दरम्यान फिल्लौर या गावाजवळ ही दुर्घटना घडली.
जम्मूहून पुण्याकडे येणारी 11077 झेलम एक्सप्रेस फिल्लोरजवळ एस-1 ते एस-10 क्रमांकाचे डबे मध्यरात्री 3 ते 3.30 च्या रुळावरुन घसरले. यामुळे जवळपास 2 किलोमीटरचे रेल्वे रुळ उखडला आहे. या अपघातानंतर दिल्लीहून पंजाबकडे जाणऱ्या सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.
सध्या या अपघातात सध्या 2 प्रवासी जखमी असल्याचे वृत्त असले, तरी याच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनास्थळी रेल्वे रुळ दुरुस्त करुन रेल्वेला वाहतूक पुर्वपदावर आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.#SpotVisuals Nine bogies of Jhelum Express derail between Jalndhar and Ludhiana in Punjab, two injured pic.twitter.com/oFqxnfHyW3
— ANI (@ANI_news) October 4, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement